TRENDING:

Sanjana Ganesan: बुमराहला एका T20 चे 3 लाख... पत्नी संजनाला एका शोसाठी किती पैसे मिळतात? चक्रावून टाकणारा आकडा

Last Updated:
Sanjana Ganesan Fees and Net Worth: जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना हे क्रिकेटच्या जगात वेगवेगळ्या धाटणीच्या या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत.
advertisement
1/14
बुमराहला एका T20 चे 3 लाख... पत्नी संजनाला एका शोसाठी किती पैसे मिळतात?
8 मार्च हा दिवस संपूर्ण भारतासाठी एखाद्या सणासारखा होता. याच दिवशी भारताने न्यूझीलंड विरुद्ध दमदार कामगिरी करत टी२० वर्ल्डकपला गवसणी घातली. या विजयाचा मोलाची कामगिरी केली ती म्हणजे भारताचा जबरदस्त बॉलर जसप्रीत बुमराह याने.
advertisement
2/14
भारताने ट्रॉफी उचलली आणि जसप्रीतच्या कामाचं खूप कौतुक झालं. यावेळी बुमराहची पत्नी संजना स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून तिथे उपस्थित होती. हे पतीपत्नी क्रिकेटच्या जगात वेगवेगळ्या धाटणीच्या या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत. अशातच संजनाबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
3/14
टीम इंडियाचा 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह जेव्हा मैदानात येतो, तेव्हा समोरच्या फलंदाजाच्या दांड्या गुल होतात. पण याच बुमराहच्या आयुष्याची विकेट कोणी काढली असेल, तर ती म्हणजे त्याची पत्नी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन.
advertisement
4/14
आज ही जोडी क्रिकेट विश्वातील सर्वात क्यूट कपल मानली जाते. मात्र, बुमराहच्या आयुष्यात येण्यापूर्वी संजना एका वेगळ्याच दुनियेत चमकत होती.
advertisement
5/14
6 मे 1991 रोजी पुण्यात जन्मलेल्या संजनाने पुण्यातच इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. काही काळ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर संजनान आपला मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला.
advertisement
6/14
2014 साली तिने Splitsvilla 7 या लोकप्रिय डेटिंग शोमध्ये भाग घेतला होता. याच शोने तिला संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली.
advertisement
7/14
याच शोमध्ये संजनाला तिचा को-कंटेस्टंट अश्विनी कौल आवडला आणि बघता बघता त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की, प्रेक्षकही त्यांच्या प्रेमात पडले.
advertisement
8/14
संजना एका टास्कमध्ये जखमी झाली आणि तिला शो सोडावा लागला, तेव्हा अश्विनीनेही तिच्या प्रेमाखातर शोला रामराम ठोकला.
advertisement
9/14
त्याकाळी अश्विनीने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, "हो, मी संजनाला डेट करतोय आणि आम्ही फक्त प्रेमी नाही तर बेस्ट फ्रेंड्स आहोत." मात्र, काही काळाने त्यांचे मार्ग वेगळे झाले.
advertisement
10/14
स्प्लिट्सव्हिलामधून बाहेर पडल्यानंतर संजनाने मागे वळून पाहिलं नाही. तिने स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून आपलं करिअर सुरू केलं. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या 'द नाईट क्लब' शोमधून तिला खरी ओळख मिळाली.
advertisement
11/14
त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप 2019, टी-20 वर्ल्ड कप 2024 आणि आयपीएलच्या अनेक सीझनमध्ये तिने होस्ट म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
12/14
2013-14 च्या आयपीएल सीझनदरम्यान एका मुलाखतीच्या निमित्ताने बुमराह आणि संजनाची पहिली भेट झाली. आधी मैत्री, मग प्रेम आणि शेवटी 15 मार्च 2021 रोजी गोव्यात एका खाजगी सोहळ्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली. आज या जोडप्याला अंगद नावाचा गोंडस मुलगा आहे.
advertisement
13/14
स्टार स्पोर्ट्सची लोकप्रिय स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि अँकर असलेली संजना प्रत्येक होस्टिंग असाइनमेंट किंवा टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांसाठी, विशेषतः प्रमुख आयसीसी स्पर्धा आणि आयपीएलसाठी, 20 लाख ते 40 लाख रुपयांपर्यंत फी आकारते असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
advertisement
14/14
संजना गणेशनची अंदाजे संपत्ती अंदाजे 8 कोटी आहे, जी मुख्यत्वे क्रिकेट ब्रॉडकास्टिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि मीडिया कामातील तिच्या यशस्वी कारकिर्दीतून तिने निर्माण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sanjana Ganesan: बुमराहला एका T20 चे 3 लाख... पत्नी संजनाला एका शोसाठी किती पैसे मिळतात? चक्रावून टाकणारा आकडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल