OTT वर येतेय श्रद्धा कपूरची ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म, जगभरात केली 17000 कोटींची कमाई, कधी आणि कुठे पाहता येणार?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shraddha Kapoor Oscar nominated film: श्रद्धा कपूरचा ऑस्कर नामांकित चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे रिलीज होणार?
advertisement
1/11

जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, अ‍ॅनिमेशन विश्वातील सर्वात मोठा चित्रपट 'झूटोपिया २' (Zootopia 2) आता तुमच्या मोबाइल आणि टीव्ही स्क्रीनवर धडकण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
2/11
हॉलीवूडच्या 'एल कॅपिटन' थिएटरमध्ये दिमाखदार प्रीमियर झाल्यानंतर २८ नोव्हेंबर २०२५ रोजी हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला होता.
advertisement
3/11
अवघ्या काही महिन्यांतच या सिनेमाने १.८६ बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १७,००० कोटी रुपयांची ऐतिहासिक कमाई करून अ‍ॅनिमेशन फिल्म्सचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
advertisement
4/11
या सिक्वेलमध्ये आपण लाडकी ससा पोलिस अधिकारी जुडी हॉप्स आणि तिचा पार्टनर कोल्हा निक वाइल्ड यांचा पुढचा प्रवास पाहणार आहोत.
advertisement
5/11
आता हे दोघे साधे नव्हे, तर अनुभवी अधिकारी बनले आहेत. एका तस्करी प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना 'गॅरी डी स्नेक' नावाच्या एका रहस्यमय सरपटणाऱ्या प्राण्याचे सुगावा लागतो. हा तपास त्यांना शहराच्या अशा कोपऱ्यात घेऊन जातो, जिथे आजवर कोणीही पोहोचलेलं नाही.
advertisement
6/11
मार्श मार्केटसारख्या लपलेल्या ठिकाणांचा शोध घेत असताना त्यांना शहराच्या भूतकाळातील काही धक्कादायक गुपिते समजतात. आता या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा झाली असून भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे.
advertisement
7/11
भारतीय प्रेक्षकांसाठी सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे, या सिनेमाच्या हिंदी डब व्हर्जनमध्ये बॉलिवूडची 'स्त्री' म्हणजेच श्रद्धा कपूर हिने मुख्य पात्र 'जुडी हॉप्स'ला आपला आवाज दिला आहे.
advertisement
8/11
श्रद्धाच्या आवाजामुळे या पात्राला एक वेगळीच जिवंतपणा प्राप्त झाला असून बच्चे कंपनीसह मोठ्यांनाही तिचं डबिंग प्रचंड भावलं आहे.
advertisement
9/11
११ मार्च २०२६ पासून हा चित्रपट डिस्ने प्लसवर स्ट्रीम होणार आहे. भारतात हा चित्रपट १३ मार्च २०२६ रोजी जिओ हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल.
advertisement
10/11
'झूटोपिया २' केवळ कमाईतच पुढे नाही, तर समीक्षकांच्या पसंतीसही उतरला आहे. ७९ व्या ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्समध्ये (BAFTA) याने 'बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर'चा पुरस्कार आधीच पटकावला आहे.
advertisement
11/11
आता सर्वांचे लक्ष लागलं आहे ते आगामी ९८ व्या ऑस्कर्सकडे, जिथे या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फिल्म'साठी नामांकन मिळाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT वर येतेय श्रद्धा कपूरची ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म, जगभरात केली 17000 कोटींची कमाई, कधी आणि कुठे पाहता येणार?