जगभरात सर्वात जास्त 'या' रंगाची गाडी का खरेदी करतात लोकं? जाणून घ्या खरं कारण
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नवी कार खरेदी करताना लोक डिझाइन, फीचर्स आणि मायलेजवर लक्ष देता.त. मात्र कारचा रंग निवडणंही तेवढाच मोठा निर्णय आहे. इंट्रेस्टिंग म्हणजे, एक जगातील असा रंग आहे ज्या रंगाच्या कार सर्वाधिक विकल्या जातात. चला आज त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/8

नवी कार खरेदी करताना लोक सर्वात जास्त गाडीची डिझाइन चेक करतात. यानंतर फीचर्स, सेफ्टी आणि मायलेजसह इतर गोष्टींवरही फोकस केला जातो. सोबतच आणखी एक इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे गाडीचा कलर निवडणे. सर्वात मोठा प्रश्न असतो की, कोणत्या रंगाची कार खरेदी केली पाहिजे.
advertisement
2/8
अशावेळी काही लोक घरातील लोक, मित्र किंवा मग आपल्या स्वतःच्या मनासारखं करतात. तर काही लोक हे प्रॅक्टिकल होऊन विचार करतात. आपण आकड्यांविषयी बोललो तर पांढरा रंग हा दशकांपासून बादशाह बनला आहे. सवात जास्त लोक याच रंगाची कार खरेदी करतात. चला जाणून घेऊया या रंगाच्या कार सर्वाधिक विकण्यामागे नेमकं काय कारण आहे.
advertisement
3/8
जगभरातील सुमारे 35 ते 40 टक्के लोक पांढऱ्या गाड्या निवडतात. भारतासारख्या देशांमध्ये ही संख्या आणखी जास्त आहे. पांढऱ्या रंगानंतर, चांदी, राखाडी आणि काळे रंग येतात. पांढऱ्या रंगाची निवड करण्यामागील क्रोनोलॉजी समजून घेऊया.
advertisement
4/8
रीसेल व्हॅल्यू : पांढऱ्या रंगाला सेफ कलर मानले जाते. ज्यावेळी आपण जुनी कार विकतो. तेव्हा पांढर्या रंगाला खरेदीदार सहज मिळतात. हा रंग कधीच फॅशनच्या बाहेर जात नाही. यामुळे या कारची रीसेल व्हॅल्यू इतर कलरच्या तुलनेत जास्त असते.
advertisement
5/8
उन्हापासून बचाव : वैज्ञानिक दृष्टीकोणातून पाहिले तर पांढऱा रंग सूर्य प्रकार सर्वात जास्त रिफ्लेक्ट करतो. यामुळे उष्णता कमी शोषूण घेतो. भारतासारख्या उष्ण देशांमध्ये पांढऱ्या कारच्या आतील तापमान गडद रंगाच्या कारच्या तुलनेत कमी राहते. ज्यामुळे एसी चांगला काम करतो आणि इंधनाची बचत होते.
advertisement
6/8
कमी देखभाल: आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काळ्या किंवा गडद रंगाच्या कारपेक्षा पांढऱ्या कारवर धूळ आणि किरकोळ ओरखडे कमी दिसतात. काळ्या कारला दररोज पॉलिशिंगची आवश्यकता असते, तर पांढऱ्या कार कमी देखभालीसह स्वच्छ राहतात.
advertisement
7/8
प्रीमियम आणि क्लासी लूक: आजकाल, कंपन्या पांढऱ्या रंगाचे विविध शेड्स (जसे की पर्ल व्हाइट किंवा आयव्हरी) देत आहेत, जे कारला प्रीमियम आणि आलिशान लूक देतात. हा रंग साधेपणा आणि सुंदरतेचे प्रतीक मानला जातो.
advertisement
8/8
सेफ्टी : अनेक संशोधन सांगतात की, पांढऱ्या रंगाच्या कार रस्त्यांवर रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात जास्त स्पष्ट दिसतात. यामुळे दुर्घटनांची शक्यता इतर गडद रंगाच्या तुलनेत थोडी कमी होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
जगभरात सर्वात जास्त 'या' रंगाची गाडी का खरेदी करतात लोकं? जाणून घ्या खरं कारण