Team India : अहमदाबादच्या फायनलवरून थेट मालदीवला, टीम इंडियाच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला ओळखलं का?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
रविवारी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या घरी गेले आहेत. तर दुसरीकडे भारतीय खेळाडू कुटुंबासोबत मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला आहे.
advertisement
1/8

लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. लागोपाठ दुसरा आणि एकूण तिसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच ठरली आहे, तसंच एखाद्या टीमने पहिल्यांदाच स्वत:च्या देशात टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला.
advertisement
2/8
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 96 रननी विजय मिळवला. या फायनलनंतर टीम इंडियाचा खेळाडू अहमदाबादवरून थेट मालदीवला गेला आहे. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
3/8
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तर जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत.
advertisement
4/8
टी-20 वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मादेखील अहमदाबादमध्ये होता. रोहित हा टी-20 वर्ल्ड कप 2026 चा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर होता. टी-20 वर्ल्ड कप फायनल झाल्यानंतर रोहित कुटुंबासोबत मालदिवला गेला आहे.
advertisement
5/8
रोहित शर्माने मालदीवमधला कुटुंबासोबतचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. यातल्या एका फोटोमध्ये रोहितने समुद्रावर पत्नी रितीकासोबत सेल्फी काढला आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये रोहितची मुलगी समायरा समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आहे.
advertisement
6/8
मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर रोहित शर्मा भारतात परत येणार आहे. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात दिसेल. आयपीएलसाठी रोहितने आधीच तयारी सुरू केली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते.
advertisement
7/8
आयपीएल 2026 मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरेल. याआधी जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये रोहित शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता.
advertisement
8/8
रोहितने आधीच टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो फक्त वनडे आणि आयपीएलमध्येच खेळताना दिसणार आहे. रोहितची बॅटिंग बघण्यासाठी त्याचे चाहते आयपीएल सुरू व्हायची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : अहमदाबादच्या फायनलवरून थेट मालदीवला, टीम इंडियाच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला ओळखलं का?