सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजेत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले. पंचायत समितीच्या २२ जागांपैकी १० जागांवर भाजपचे सदस्य जिंकून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गट ४, काँग्रेस आणि अजित पवार गट ३ तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत समीकरणे जुळवून आणेल, अशी चर्चा असताना मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली.
advertisement
भारतीय जनता पक्षाने सभापती पदासाठी राणी भोरे आणि उपसभापती पदासाठी पांडुरंग पाटील यांना उमेदवारी दिली. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपने निवडणुकीचे समीकरणे फिरविण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदेसेनेने आपले वजन महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्याने काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयी झाल्या.
सांगलीत कोणत्या पंचायत समितीवर कोणत्या पक्षाचा सभापती?
-मिरज पंचायत समितीमध्ये नाट्यमय घडामोडी नंतर सभापती पद काँग्रेसकडे
-मिरज पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी सुनील कमलेकर, उपसभापतीपदी शिंदेंसेनेच्या ललिता अशोक शेजुळ यांची निवड
-पलूस, कडेगाव, मिरज या तीन पंचायत समिती काँग्रेसकडे
-वाळवा, शिराळा, कवठेमहांकाळ तीन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे
-आटपाडी आणि खानापूर दोन शिवसेनेकडे, तर जत पंचायत समिती भाजपकडे
-तासगाव पंचायत समिती अजित पवार गटाकडे
