TRENDING:

Weather Alret : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, बुधवारी आणखी संकट वाढणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
कोकणातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोल्यामध्ये तापमान वाढ कायम असेल.
advertisement
1/7
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, बुधवारी आणखी संकट वाढणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढाच पाहिला मिळत आहे. 11 मार्च रोजीही उष्ण आणि दमट हवामान महाराष्ट्रात पाहण्यास मिळेल. कोकणातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोल्यामध्ये तापमान वाढ कायम असेल. 11 मार्च रोजी विभागानुसार हवामान कसे राहील, पाहूयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल 34-38 अंश सेल्सियस तर किमान तापमान 23-26 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 35-38 अंश सेल्सियस तर किमान 18-21 अंश सेल्सियस तापमान राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 34-37 अंश सेल्सियस तर किमान 19-22 अंश सेल्सियस तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 35-39 अंशांपर्यंत, किमान 20-23 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 36-40 अंश सेल्सियस तर किमान 21-24 अंश सेल्सियस तापमान राहील. विदर्भातील अकोल्याला उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
7/7
एकंदरीत, 11 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याचा तीव्र चटका कायम राहील. उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, तसेच भरपूर पाणी प्यावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alret : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, बुधवारी आणखी संकट वाढणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल