पण उन्हाळ्यात किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण काय आहे ते समजून घेऊया.
उन्हाळ्यात किडनी स्टोन होण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे डिहायड्रेशन. शरीरात पुरेसं पाणी नसतं तेव्हा मूत्रातील खनिजं आणि क्षार हळूहळू जमा होतात आणि खडे तयार होतात. मूत्रपिंडांचं काम शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करणं आणि ते मूत्राद्वारे बाहेर टाकणं असं आहे.
advertisement
Coughing : कोरडा/ओल्या खोकल्यामधे काय फरक असतो ? कोणते उपचार लागू पडतील ?
पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा मूत्र दाट किंवा घट्ट होतं आणि कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक ऍसिड सारखे घटक खडे म्हणजे क्रिस्टल्स तयार करू लागतात. कालांतरानं, हे लहान क्रिस्टल्स मोठे होतात आणि मूत्रपिंडातील दगड म्हणजे किडनी स्टोन तयार होतात.
उन्हाळ्यात, शरीर घामाद्वारे भरपूर पाणी गमावतं. याची कमतरता पाणी पिऊन भरून काढली नाही तर लघवीचं प्रमाण कमी होतं आणि त्यातल्या खनिजांचं प्रमाण वाढतं. म्हणूनच या ऋतूमध्ये किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो असं मूत्रविकार तज्ज्ञांनी म्हटलंय.
मूत्रपिंडातील दगडांचा धोका वाढवणारे घटक -
निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन - उन्हाळ्यात जास्त घाम येण्यानं शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. पुरेसे पाणी न प्यायल्यानं लघवीचं उत्पादन कमी होऊ शकतं आणि लघवीतील खनिजं जमा होऊ शकतात.
जास्त मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न - आहारात जास्त मीठ, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ असतील तर यामुळे शरीरात कॅल्शियम आणि इतर खनिजांचं प्रमाण वाढू शकतं, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.
ऑक्सलेट जास्त असलेल्या पदार्थांचे जास्त सेवन - पालक, चहा, चॉकलेट आणि काही सुक्या मेव्यात ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असतं. या पदार्थांचं प्रमाण जास्त असेल तर यामुळेही किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
दीर्घकाळ बसून राहणं किंवा नियमित व्यायाम न करणं यामुळे शरीराच्या चयापचयावर परिणाम होतो, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढू शकतो.
किडनी स्टोनची लक्षणं -
किडनी स्टोनमुळे अनेकदा पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात. लघवी करताना जळजळ होणं, लघवीत रक्त येणं, वारंवार लघवी होणं, मळमळ किंवा उलट्या होणं अशी लक्षणं देखील उद्भवू शकतात. यामुळे काही वेळा तापही येऊ शकतो. ही लक्षणं आढळली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.
Teeth Care : मौखिक स्वच्छतेसाठी वापरा नैसर्गिक उपाय, घरी बनवा टूथपेस्ट
किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय करायचं ?
मूतखडे रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हायड्रेटेड राहणं. उन्हाळ्यात दररोज किमान 2.5 ते 3 लीटर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी आणि ताक यांसारखी पेयं देखील डिहायड्रेशन भरून काढण्यास मदत करतात.
मूत्रपिंडं निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं, मीठ आणि जंक फूडचं प्रमाण कमी करणं आणि नियमित शारीरिक हालचाली करणं महत्वाचं आहे असं मूत्रविकार तज्ज्ञांनी म्हटलंय. याव्यतिरिक्त, जास्त वेळ लघवी रोखून ठेवण्याची सवय टाळली पाहिजे. ज्यांना आधी मूत्रपिंडात खडे झाले आहेत त्यांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी आणि डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
