advertisement

Teeth Care : मौखिक आरोग्यासाठी घरगुती उपाय, दात होतील स्वच्छ आणि हिरड्या होतील मजबूत

Last Updated:

दात घासायचे म्हणजे टूथपेस्ट हवी. यात रसायनांबरोबरच बहुतेकदा लवंग आणि मीठ वापरलेलं असतं. पण, अनेक टूथपेस्टमुळे पिवळेपणा दूर होत नाही. यासाठी नैसर्गिक टूथपेस्ट वापरणं हा चांगला पर्याय आहे, ही टूथपेस्ट तुम्ही घरी सहजपणे तयार करू शकता.

News18
News18
मुंबई : मौखिक आरोग्य हा सर्वांसाठी महत्त्वाचा विषय. मौखिक आरोग्य म्हणजे केवळ दात घासणं नाही तर जीभ स्वच्छ करणं आणि ऑईल पुलिंग देखील आवश्यक आहे.
दात घासायचे म्हणजे टूथपेस्ट हवी. यात रसायनांबरोबरच बहुतेकदा लवंग आणि मीठ वापरलेलं असतं. पण, अनेक टूथपेस्टमुळे पिवळेपणा दूर होत नाही. यासाठी नैसर्गिक टूथपेस्ट वापरणं हा चांगला पर्याय आहे, ही टूथपेस्ट तुम्ही घरी सहजपणे तयार करू शकता.
advertisement
ही नैसर्गिक टूथपेस्ट बनवण्यासाठी जांभळाच्या बिया आणि पानं उन्हात वाळवा आणि त्यांची बारीक पावडर बनवा. या मिश्रणात लवंग पावडर, त्रिफळा पावडर आणि खडे मीठ घाला. सर्व काही एका काचेच्या बाटलीत एकत्र ठेवा.
दररोज सकाळी बोटानं किंवा ब्रशनं दात आणि हिरड्यांना पावडर लावा. दोन मिनिटं मालिश करा, नंतर स्वच्छ धुवा. काही आठवड्यांत तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील.
advertisement
या पावडरनं दातांची चमक परत येईल शिवाय हिरड्यांना सूज आणि रक्तस्त्राव देखील कमी करेल.
घरगुती टूथपेस्टचे फायदे:
जांभळाच्या बियांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे दातांना किडणे आणि संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात, तर जांभळाच्या पानांमध्ये पिवळेपणा दूर करण्याची शक्ती असते. जर तुम्हाला पायरिया असेल तर ही पावडर लवकरच परिणाम दाखवेल. लवंग दातांना मुळांपासून मजबूत करेल आणि सैंधव मीठ देखील संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत करेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Teeth Care : मौखिक आरोग्यासाठी घरगुती उपाय, दात होतील स्वच्छ आणि हिरड्या होतील मजबूत
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement