Belly Fat : तिशीतच का दिसतो पोटोबा ? तिशीच्या टप्प्यावर शरीरात कोणते बदल होतात ? जाणून घ्या शरीर विज्ञान
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लठ्ठपणा ही आजकालच्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. पोटाची चरबी ही बहुतेकांसाठी एक मोठी चिंता आहे, कारण याचे परिणाम सगळ्यांनाच जाणवतात. पण शरीरात तीस वर्षांचं झाल्यानंतर प्रामुख्यानं हे बदल का जाणवतात समजून घेऊया.
मुंबई : वयाच्या तिशीच्या टप्प्यावर शरीरात अनेक बदल होत असतात. आधी जी ऊर्जा जाणवत असते, ती तिशीच्या टप्प्यानंतर जाणवेलच असं नाही. या वयात पोट वाढण्याचीही शक्यता असते पण का ते समजून घेऊया.
लठ्ठपणा ही आजकालच्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. पोटाची चरबी ही बहुतेकांसाठी एक मोठी चिंता आहे, कारण याचे परिणाम सगळ्यांनाच जाणवतात. पण शरीरात तीस वर्षांचं झाल्यानंतर प्रामुख्यानं हे बदल का जाणवतात समजून घेऊया.
पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. सेठी यांच्या मते, वयाची तिशी ही एक महत्त्वाची पायरी असते जेव्हा शरीराच्या रचनेत बदल होऊ लागतात. कोणते बदल जाणवू शकतात:
advertisement
अन्न - नेहमीसारखंच जेवण करत असलात तरी तेच अन्न, जास्त चरबीच्या रुपात दिसतं. पोटावर चरबीचा थर जमा होऊ शकतो.
व्यायाम - जिममधे आधीप्रमाणे व्यायाम करत असलात तरीही, पूर्वीसारखे परिणाम दिसत नाहीत.
चीट डे - म्हणजे डाएटनुसार न खाता एखादा दिवस आवडीप्रमाणे खाल्लं तर शरीरावर त्याचे परिणाम दिसत नसतील तर तिशीच्या टप्प्यावर चीट डे च्या खाण्याचाही भार जाणवतो. पूर्वी, जर तुम्ही अधूनमधून बाहेर जेवत असता तर काही फरक पडत नसता, पण आता एक चीट डे चे परिणामही तुमच्या शरीरावर स्पष्टपणे दिसून येतात.
advertisement
हे बदल का होतात समजून घेऊयात -
स्नायू - तीस वर्षांच्या वयानंतर, आपल्या शरीरातील स्नायूंचं प्रमाण 3% ते 8% कमी होऊ लागतं. स्नायू हे आपल्या शरीराचं इंजिन असतात, कॅलरीज बर्न करतात. स्नायूंचे प्रमाण कमी होतं, तेव्हा शरीर विश्रांती घेत असतानाही कमी कॅलरीज बर्न करतं.
इन्सुलिन - आपले स्नायू शरीरातील 70-80% साखर (ग्लुकोज) शोषून घेतात. स्नायूंचं प्रमाण कमी होतं तेव्हा साखर रक्तप्रवाहात जास्त काळ टिकते आणि शेवटी पोटातील चरबी म्हणून जमा होते. डॉक्टरांच्या मते, दर दहा वर्षांनी आपली इन्सुलिन संवेदनशीलता 4-5% नं कमी होते, ज्यामुळे आपण कार्बोहायड्रेट खाल्ले तर साखरेची पातळी वेगानं वाढते. हे मिश्रण थेट व्हिसरल फॅट वाढवण्यास हातभार लावते, जे अवयवांभोवती जमा होतं आणि त्यामुळे सूज येते.
advertisement
सुरुवातीला कोणती लक्षणं दिसतात याविषयीही डॉ. सेठी यांनी माहिती दिली.
वजन वाढलं नाही तरी पोटाचा घेर वाढू शकतो.
दुपारी उर्जेची कमतरता जाणवणं.
गोड पदार्थांची तल्लफ वाढण.
कार्ब्स खाल्ल्यानंतर पोट फुगणं.
पोटाच्या वरच्या भागात चरबी जमा होणं.
advertisement
ही लक्षणं दिसल्यानंतर काय करु शकता -
प्रथिनांचं प्रमाण वाढवा - दररोज तुमच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 1.2 ते 1.6 ग्रॅम प्रथिनं घ्या. यामुळे स्नायूंचं प्रमाण टिकून राहील.
स्ट्रेंथ ट्रेनिंग - आठवड्यातून किमान तीन वेळा वजन उचलण्याचे व्यायाम करा.
दररोज चालणं - चालण्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
advertisement
पुरेशी झोप घ्या - दररोज सात-आठ तास गाढ झोप घेणं आवश्यक आहे, कारण झोपेच्या अभावामुळे हार्मोन्समधे अडथळा येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 8:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Belly Fat : तिशीतच का दिसतो पोटोबा ? तिशीच्या टप्प्यावर शरीरात कोणते बदल होतात ? जाणून घ्या शरीर विज्ञान








