TRENDING:

‎अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले अन् अचानक मधमाशांचा हल्ला; चिमुरडीसह 35 पर्यटक जखमी!

Last Updated:

लेणी पाहण्यासाठी आलेल्या सुमारे 30 ते 35 पर्यटकांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेत 4 ते 5 लहान मुलांसह अनेक पर्यटक जखमी झाले असून काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरात आज मधमाशांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. लेणी पाहण्यासाठी आलेल्या सुमारे 30 ते 35 पर्यटकांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेत 4 ते 5 लहान मुलांसह अनेक पर्यटक जखमी झाले असून काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
‎अजिंठा लेणीत मधमाशांचा अचानक हल्ला; 30-35 पर्यटक जखमी, जबलपूरच्या चिमुकलीची प्र
‎अजिंठा लेणीत मधमाशांचा अचानक हल्ला; 30-35 पर्यटक जखमी, जबलपूरच्या चिमुकलीची प्र
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील जबलपूर येथून एक कुटुंब खास अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी परिसरात फिरत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या कुटुंबातील एका लहान मुलीच्या घोट्याला मधमाशांनी अनेक ठिकाणी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली.

APMC Market: कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video

advertisement

आपल्या मुलीला वाचवण्यासाठी पालकांनी केलेली धडपड आणि मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पर्यटकांनी घेतलेली पळापळ यामुळे काही काळ परिसरात धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी पर्यटकांना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अजिंठा लेणी परिसरात मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे. विशेषतः लहान मुलांवर झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण पसरले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‎अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले अन् अचानक मधमाशांचा हल्ला; चिमुरडीसह 35 पर्यटक जखमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल