TRENDING:

Thar ने अपघात हे तर नाटक! गेम होता 70000000 रुपयांचा, जळगावच्या प्रकरणाला चक्रावून टाकणारं वळण

Last Updated:

विमा कंपनीकडे दाखल केलेल्या दाव्यात जाधव याने त्याचा मूळ पत्ता मालेगाव येथील राम मंदिर परिसरातील रहिवासी असल्याचे पुरावे सादर केले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव:  'मयताच्या टाळू वरचं लोणी खाणे' अशी एक म्हण आपल्याकडे सर्रासपणे आपण बोलत असतो. पण, जळगावमध्ये विमा एजंटने या म्हणीचा प्रत्यय सत्यात करून दाखवला आहे. एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख लाटण्याचा प्लॅन रचला. पण, हा कट फक्त ५० लाखांसाठी नव्हताच. हे प्रकरण आता ७ कोटी रुपयांचं असल्याचं उघड झालं आहे.

advertisement

50 लाखांचा अपघाती विमा लाटण्यासासाठी जळगावमध्ये एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला. या प्रकरणात मृताची बायको, भाऊ आणि  चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

advertisement

काय आहे प्रकरण? 

राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सिडेंट विम्याचा दावा पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता. दावा करताना १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव जखमी होऊन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलं होतं. यावेळी चाळीसगाव ग्रामीण येथील डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना पोलिसांनी प्राथमिक अहवालाासह पोस्टमार्टम रिपोर्ट दिला होता. त्यानंतर याप्रकरणी मेहुनबारे पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. ८६/२०२५ अशी नोंदही करण्यात आली होती.

advertisement

विमा कंपनीने डाव उलटवला

विमा कंपनीने एका खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून चौकशी केल्यानंतर मोठ्या विसंगती आढळल्या. तपासात राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजारानं झाल्याचं समोर आले. चौकशीदरम्यान त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही मृत्यूची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी नमूद असल्याचं आढळलं. तसंच ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्येही त्यांची नोंद नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झाले. याशिवाय मृताच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते असल्याचे तसंच त्यांच्या नावावर इतर सुमारे १० विमा कंपन्यांकडूनही पॉलिसी घेण्यात आल्याचे समोर आले.

advertisement

विम्यासाठी पत्ते अन् ओळखीचे पुरावेही बोगस

विमा कंपनीकडे दाखल केलेल्या दाव्यात जाधव याने त्याचा मूळ पत्ता मालेगाव येथील राम मंदिर परिसरातील रहिवासी असल्याचे पुरावे सादर केले होते. त्यासाठीचे आधार कार्डचा पुरावा देखील जोडला होता. प्रत्यक्षात चौकशीत जाधव हे लखमपूरचे रहिवासी होते. तसंच व्यवसायासाठी दिलेल्या पत्त्यावरही त्यांचे अस्तित्व आढळले नाही. विमा मिळवण्यासाठी पत्ता आणि ओळखीचे पुरावे देखील बनावट आढळून आले.

ग्रामपंचायतीकडेही मृत्यूची नोंद नसल्याचे उघड

जाधव यांच्या मृत्यूच्या तारखेवरून संशय असतानाच कंपनीकडून माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार लखमापूर ग्रामपंचायतीकडे राजेंद्र शालींदर जाधव यांच्या मृत्यू दाखल्याची माहिती मागवली. त्यावर ग्रा.पं. ने राजेद्र उर्फ राजू जाधव यांचा मृत्यू २३ फेब्रुवारी २४ रोजी झालेला आहे. मात्र, ग्रामपंचायत लखमापूरचे मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये त्यांची तपासणी केली असता ती आढळून आलेली नाही.

११ कंपन्या आणि ७ कोटींचा विमा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

राजेंद्र जाधव यांच्या नावावर श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीचा ५० लाख, टाटा एआयए (१.३५ कोटी), बिर्ला सन लाइफ (१ कोटी), पीएनबी मेटलाईफ (१ कोटी) कोटक महिंद्रा १ कोटी अशा एकूण ११ कंपन्यांकडून सुमारे ७ कोटी रुपयांचा विमा घेण्यात आला होता. एकाच व्यक्तीच्या नावावर इतके विमा असणे आणि संशयास्पद मृत्यू होणे, हे विमा हडपण्यासाठी रचलेला सुनियोजित कट असल्याचे तपासात उघडकीस आले होते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thar ने अपघात हे तर नाटक! गेम होता 70000000 रुपयांचा, जळगावच्या प्रकरणाला चक्रावून टाकणारं वळण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल