TRENDING:

मराठवाड्यात हुडहुडी, 2 जिल्ह्यांत तापमान 8 अंश सेल्सिअस, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसा सूर्यप्रकाश तर रात्री थंडीचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात हुडहुडी, 2 जिल्ह्यांत तापमान 8 अंश सेल्सिअस, हवामान विभागाचा अलर्ट
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 8 जानेवारी रोजी हवामान मुख्यतः थंड आणि कोरडे हवामान राहील. दिवसा सूर्यप्रकाश जाणवेल तर रात्री थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दिवसभर सूर्यप्रकाश जाणवेल. कमाल तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअस राहील. रात्रीच्या वेळी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दोन्ही जिल्ह्यांत थोडासा गारठा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी रात्री उबदार कपड्यांचा वापर करावा.
advertisement
3/5
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दिवसभर सौम्य सूर्यप्रकाश अनुभवता येईल. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रात्री मात्र तापमान कमी होऊन 11 अंश सेल्सिअस आणि 13 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. या भागांतील शेतकऱ्यांसाठी हे हवामान रब्बी हंगामातील पीकवाढीसाठी अनुकूल ठरेल.
advertisement
4/5
नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये दिवसभर निरभ्र आकाश आणि उबदार हवामान असेल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. थंड हवामानामुळे रात्री नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बीड आणि हिंगोली जिल्ह्यांतही दिवसभर मध्यम स्वरूपाचं हवामान असेल. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. दिवस थोडासा उबदार असला तरी रात्री थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात हुडहुडी, 2 जिल्ह्यांत तापमान 8 अंश सेल्सिअस, हवामान विभागाने दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल