IND vs PAK : 11 नाही पाकिस्तानचे 5 खेळाडू टीम इंडियावर भारी पडणार,कोणत्याही क्षणी मॅच फिरवणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानचे 5 खेळाडू असे आहेत, जे टीम इंडियावर भारी पडू शकतात. त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/7

येत्या रविवारी 15 फेब्रुवारी 2026 ला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/7
या लढतीआधी दोन्ही संघ आमने सामने येण्यासाठी उत्सुक आहे.तत्पुर्वी दोन्ही टीमकडून एकमेकांना उसकवण्याचे प्रयत्न सूरू आहे. दरम्यान पाकिस्तानचे 5 खेळाडू असे आहेत, जे टीम इंडियावर भारी पडू शकतात. त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
पहिला खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा ओपनर साहिबजादा फरहान. हा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नेदरलँड विरूद्ध 47 धावांची खेळी केली होती.तर अमेरिकेविरूद्ध साहिबजादा फरहानने 73 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्यामुळे त्याचा हा फॉर्म पाहता तो टीम इंडियाला अडचणीची ठरू शकते.
advertisement
4/7
पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर सायम अयुब. हा खेळाडू वर्ल्डकपपासून खास अशी कामगिरी करू शकला नाही आहे. त्याने नेदरलँड विरूद्ध 24 आणि अमेरिकेविरूद्ध 19 धावा केल्या होत्या.पण असं बोललं जातंय हा खेळाडू टीम इंडियाविरूद्ध चांगली खेळी करू शकतो. आता किती धावा करतो? हे सामन्यानंतर कळणार आहे.
advertisement
5/7
पाकिस्तानचा ऑलराऊंडर फहीम अश्रमने नेदरलँड विरूद्ध 11 बॉलमध्ये 29 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. या खेळीमुळे पाकिस्तान वर्ल्ड कपचा पहिला सामना जिंकली होती.त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो फ्ल़ॉप ठरला होता.पण त्याची ही मॅच विनिंग खेळी टीम इंडियाला कोणत्याही क्षणी संकटात ढकलू शकते.
advertisement
6/7
पाकिस्तान वेगवान गोलंदाज सलमान मिर्झाने नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात तीन विकेट काढल्या होत्या. युएसए विरूद्ध त्याला संधी मिळाली नव्हती. हा खेळाडू फारसा तसा नावाजलेला नाही आहे. पण तरीही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
advertisement
7/7
पाचवा खेळाडू उस्मान तारीक, जो सध्या त्याच्या वादग्रस्त बॉलिंग अॅक्शनमुळे क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. त्याने युएई विरूद्धच्या सामन्यात तीन विकेटस घेतल्या होत्या. तसेच त्याने भारत दबावात असल्याचे विधान केले होते.त्याच्या या बॉलिंग अॅक्शनमुळे टीम इंडिया नक्कीच चितेंत असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 11 नाही पाकिस्तानचे 5 खेळाडू टीम इंडियावर भारी पडणार,कोणत्याही क्षणी मॅच फिरवणार