TRENDING:

Police Bharati 2026: नवी मुंबईत होतेय जम्बो पोलीस भरती, ठिकाणी कसं जायचं? राहण्याची व्यवस्था कुठे? संपूर्ण माहिती एकाच पेजवर

Last Updated:

तरूणांनो आणि तरूणींनो तुम्ही सुद्धा पोलीसभरतीसाठी नवी मुंबईमध्ये येणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भरती सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत कसं जायचं, तुमच्यासाठी बेस्ट रूट कोणता? जाणून घेऊया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: राज्यभरात आजपासून (11 फेब्रुवारी) पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच मैदानी चाचणीसाठी उमेदवार ग्राउंडवर हजर झालेले पाहायला मिळाले. नवी मुंबईमध्ये सुद्धा कळंबोली मुख्यालयाच्या परेड मैदानात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पुढच्या महिनाभर ही भरती प्रक्रिया चालू राहणार आहे. जर तरूणांनो आणि तरूणींनो तुम्ही सुद्धा पोलीसभरतीसाठी नवी मुंबईमध्ये येणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भरती सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत कसं जायचं, तुमच्यासाठी बेस्ट रूट कोणता? जाणून घेऊया...
jumbo police recruitment is going on in navi mumbai how to reach the place where is the accommodation all information see here
jumbo police recruitment is going on in navi mumbai how to reach the place where is the accommodation all information see here
advertisement

सध्या पोलीस भरती सुरू असलेल्या कळंबोली मुख्यालयाच्या परेड मैदानामध्ये (सेक्टर 2, मुंब्रा रोड, नवी मुंबई - 410218) जाण्यासाठी तुम्हाला वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने सायन- पनवेल महामार्ग, NH 48 आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपासून जवळ आहे. जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर, तुम्हाला मानसरोवर रेल्वे स्टेशन सोयीचं पडेल. जे हार्बर रेल्वे मार्गावर आहे. कळंबोली पोलीस मुख्यालय, रोडपाली इथे जाण्यासाठी मानसरोवर (Manasarovar) हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे हार्बर लाईन (CSMT-Panvel) वर येते. मानसरोवर स्टेशनवरून तुम्ही रिक्षा किंवा बसने पोलीस मुख्यालयापर्यंत सहज पोहोचू शकता. ठाणे-वाशी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून पनवेल लोकल पकडून मानसरोवर येथे उतरावे.

advertisement

एकूण रिक्त असलेल्या 533 पदासाठी 50 हजार 460 उमेदवार भरतीच्या मैदानात उतरले आहेत. ही भरती प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2026 ते 14 मार्च 2026 पर्यंत चालणार असल्याची माहिती पोलीस मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली. यासाठी एक पोलीस उपायुक्त, तीन सहाय्यक पोलीस आयुक्त, 15 पोलीस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 400 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

11 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान कागदपत्रांची तपासणी, शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर लेखी परिक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी (निवास, भोजन) सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे. स्वच्छतेसाठी पनवेल महानगर पालिकेची मदत घेण्यात येणार आहे. भरती ठिकाणी वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Police Bharati 2026: नवी मुंबईत होतेय जम्बो पोलीस भरती, ठिकाणी कसं जायचं? राहण्याची व्यवस्था कुठे? संपूर्ण माहिती एकाच पेजवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल