Maruti Ertiga चा भीषण अपघात, ST बसही जागेवरच थांबली, घटनास्थळाचे PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
कर्जत इथं पनवेल-कर्जत मार्गावर मारुती सुझुकी एर्टिगा आणि एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधली २ जण गंभीर जखमी झाले आहे. (संतोष दळवी, प्रतिनिधी)
advertisement
1/6

मुंबई जवळील कर्जतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्जत इथं पनवेल-कर्जत मार्गावर मारुती सुझुकी एर्टिगा आणि एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधली २ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
2/6
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-पनवेल मार्गावर संध्याकाळी ही घटना घडली. कर्जत चौक रोडवर पनवेलहून कर्जतकडे येणारी एसटी आणि कर्जतहून चौक खालापूरकडे जाणाऱ्या एर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली.
advertisement
3/6
हा अपघात इतका भीषण होता की, एर्टिगा कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात एर्टिगा कार निम्मी संपली आहे.
advertisement
4/6
तर एसटी बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचे नुकसान झालं आहे. भरधाव वेगात असलेल्या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
advertisement
5/6
या अपघातात एर्टिगा कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. बसमधील प्रवाशांनी धाव घेतली. जखमी युवकांना तातडीने रायगड हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
6/6
जखमी युवक वांगणी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी तरुणांवर उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच कर्जत आणि खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना हॉस्पिटल दाखल केलं आहे. या अपघाताचा तपास पोलीस करत आहे.