TRENDING:

सोनं-चांदीचं बजेट नसेल, तर अक्षय तृतीयेला न चुकता खरेदी करा 'या' 5 वस्तू; वर्षभर होईल भरभराट

Last Updated:
यावर्षी 19 एप्रिल 2026, रविवार रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी 'अक्षय' राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
1/7
सोनं-चांदीचं बजेट नसेल, तर अक्षय तृतीयेला न चुकता खरेदी करा 'या' 5 वस्तू; वर्षभर होईल भरभराट
यावर्षी 19 एप्रिल 2026, रविवार रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी 'अक्षय' राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
2/7
अनेकांना या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा असते, पण वाढत्या दरांमुळे किंवा बजेट नसल्यामुळे ते शक्य होत नाही. मात्र, शास्त्रानुसार केवळ सोनेच नाही, तर इतरही काही अत्यंत स्वस्त आणि शुभ वस्तू आहेत, ज्यांची खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो.
advertisement
3/7
मातीचा माठ : उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या या सणादिवशी मातीचा माठ किंवा रांजण खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवीन माठ घेऊन त्यात पाणी भरून त्याचे दान करणे किंवा घरात वापरणे हे वरुण देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शीतलता आणि सुख-शांती लाभते.
advertisement
4/7
पिवळ्या कवड्या : समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या कवड्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. जर सोन्याचे दागिने घेणे शक्य नसेल, तर 5 किंवा 11 पिवळ्या कवड्या खरेदी करा. अक्षय तृतीयेच्या पूजेत त्यांची केशर आणि हळदीने पूजा करून त्या धनस्थानावर ठेवा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात.
advertisement
5/7
सैंधव मीठ : मीठ हे शुक्र ग्रहाशी आणि लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात नवीन सैंधव मिठाचे पाकीट आणणे भाग्योदय करणारे ठरते. या दिवशी नवीन मिठाचा वापर जेवणात केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि वास्तूदोष दूर होण्यास मदत होते.
advertisement
6/7
दक्षिणावर्ती शंख किंवा श्रीयंत्र: जर तुम्हाला व्यवसायात वाढ हवी असेल, तर या दिवशी एक लहान दक्षिणावर्ती शंख किंवा तांब्याचे श्रीयंत्र खरेदी करा. हे लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप मानले जातात. यांची स्थापना केल्याने घरातील गरिबी दूर होते आणि व्यवसायात 'बंपर' यश मिळण्याचे योग जुळून येतात.
advertisement
7/7
अक्षता : तांदळाला 'अक्षता' म्हणतात, ज्याचा अर्थ ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी दर्जेदार अखंड तांदूळ खरेदी करून ते लक्ष्मी-विष्णूच्या पूजेत वापरावेत. पूजेनंतर हे तांदूळ आपल्या धनसंचय करण्याच्या जागी ठेवल्याने संपत्तीत अक्षय वाढ होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सोनं-चांदीचं बजेट नसेल, तर अक्षय तृतीयेला न चुकता खरेदी करा 'या' 5 वस्तू; वर्षभर होईल भरभराट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल