TRENDING:

Metro 9 Line : ट्रॅफिकची कटकट नको, 15 मिनिटांत पोहोचा, अंधेरी ते मिरारोड हाकेच्या अंतरावर

Last Updated:
Metro 9 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दहिसर ते काशिगाव मेट्रो ९ चे उद्घाटन होत आहे. या मार्गिकेमुळे अंधेरी ते मीरा रोड हा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांत होईल. मेट्रो 7 ला जोडल्या गेल्याने प्रवाशांचा तासनतास वाचणारा वेळ वाचणार आहे.
advertisement
1/7
 ट्रॅफिकची कटकट नको, 15 मिनिटांत पोहोचा, अंधेरी ते मिरारोड हाकेच्या अंतरावर
मुंबईकरांच्या प्रवासात आता एक मोठा बदल घडवण्यासाठी एक नवीन सेवा आजपासून सुरु होणार आहे. शहरात सध्या अनेक मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होत आहे, त्यातच दहिसर ते काशीगाव या मेट्रो 9 मार्गिकेचा आज शुभारंभ केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन केले जाणार आहे.
advertisement
2/7
मेट्रो 9 ही नवी मार्गिका मुंबई शहरातील सुरु असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक मानली जाते. ही मार्गिका दहिसर ते काशीगाव या दोन भागांना थेट जोडणारी आहे. यामुळेच या परिसरातील नागरिकांना आता जलद प्रवासाचा आणि अधिक सोयीस्कर पर्याय मिळाला आहे.
advertisement
3/7
मा नव्या मार्गिकेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ती मेट्रो 7 शी जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंतचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासात मोठी बचत होणार असून बराच वेळही वाचला जाईल.
advertisement
4/7
एमएमआरडीएने या प्रकल्पासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे गुंदवली अर्थात अंधेरी पूर्व ते काशीगाव असा थेट प्रवास शक्य आहे. ही सेवा झाल्यानंतर हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
5/7
आधी या मार्गावरुन प्रवास करताना नागरिकांना प्रचंड अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. विशेषतहा अंधेरी ते मीरा रोड या प्रवासात बराच वेळ वाया जात होता. मात्र आता या मेट्रो मुळे हा प्रवास फक्त 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
advertisement
6/7
या मेट्रो मार्गावर आता दहिसर, पांडुरंग वाडी ,मिरा गाव तसेच काशीगाव अशी चार मुख्य स्थानके असतील त्यामुळे जवळच्या स्थानकातून सहज प्रवास करता येईल.
advertisement
7/7
या सेवेच्या वेळेबद्दल सांगायचे झाल्यास या मार्गावर पहिली मेट्रो सकाळी 5.50 वाजता सुटेल तर शेवटची मेट्रो रात्री 11 वाजता असेल. दररोज एकूण 276 फेऱ्या चालवल्या जातील. शनिवारी 223 आणि रविवारी 205 फेऱ्या असतील
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Metro 9 Line : ट्रॅफिकची कटकट नको, 15 मिनिटांत पोहोचा, अंधेरी ते मिरारोड हाकेच्या अंतरावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल