TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावरील अवकाळी संकट टळलं, आता पुन्हा उष्णतेची लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
आता राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 8 मार्चला उष्ण हवामान राहील. विभागानुसार हवामान कसे राहील पाहूयात.
advertisement
1/7
महाराष्ट्रावरील अवकाळी संकट टळलं, आता पुन्हा उष्णतेची लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे संकट आता टळलं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 8 मार्चला उष्ण हवामान राहील. विभागानुसार हवामान कसे राहील पाहूयात.
advertisement
2/7
कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये ही स्थिती पाहायला मिळेल. मुंबईत कमाल 29-34 अंश सेल्सियस राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 32-34 अंश राहील. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये 30-32 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 32-34 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा सर्वाधिक उष्ण तापमान राहील. कमाल तापमान 34-36 अंश राहील.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात आता पुन्हा उष्णता वाढलेली पाहायला मिळेल. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावरील अवकाळी संकट टळलं, आता पुन्हा उष्णतेची लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल