TRENDING:

कडक उन्हात झाडी राहातील हिरवी, अशी घ्या वेळीच काळजी, सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Last Updated:
बऱ्याच ठिकाणी आपल्याला घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा परसात कुंड्यांमध्ये लावलेली झाडे सुकलेली पाहायला मिळतात. त्यामुळे या कडक उन्हात झाडांची काळजी घेणे गरजेचे ठरते.
advertisement
1/7
कडक उन्हात झाडी राहातील हिरवी, अशी घ्या वेळीच काळजी, सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर
उन्हाचा चटका राज्यात चांगलाच वाढलेला दिसतोय. यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा परसात कुंड्यांमध्ये लावलेली झाडे सुकलेली पाहायला मिळतात.
advertisement
2/7
त्यामुळे या कडक उन्हात झाडांची काळजी घेणे गरजेचे ठरते. झाडांची नेमकी कशी काळजी घेतली गेली पाहिजे? याबाबत रोपवाटिका चालक रोहित शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
आपण आपल्या घराच्या आसपास लावलेल्या झाडाला रोजच्या रोज नीट पाणी देणे गरजेचे आहे. यासोबतच कडक उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी उपाययोजना आवर्जून केल्या पाहिजेत, असे रोहित शिंदे यांनी सांगितले आहे.
advertisement
4/7
घरात लावलेली झाडे ही सावलीतच असतात. पण अंगणातील झाडांवर कडक ऊन पडत असल्यास किंवा टेरेसवर, बाल्कनीत लावलेल्या झाडांची उन्हाळ्यात काळजी घ्यावी लागते.
advertisement
5/7
त्यामुळे टेरेस किंवा बाल्कनीमधील झाडांना सावली करण्यासाठी ग्रीन पॉलीहाऊस कापड वापरून झाडांना सावली करा. यामध्ये आपण अंगणातील झाडांसाठी देखील थोड्याफार प्रमाणात सावली केली पाहिजे. तसेच दुपारी 12 ते 3 या कडक उन्हात झाडे उन्हात राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
पाहायला गेलं तर उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता प्रत्येकालाच असते. झाडांना देखील या दिवसात जास्त पाणी लागते. यामुळे आपण झाडांना रोज संध्याकाळी पाणी घातले तर ते झाड चांगले राहते. दिवसा दिलेले पाणी उन्हामुळे झाडांना मिळतच नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दिलेले पाणी रात्रभर मातीत मुरून झाडांसाठी ओलावा टिकवून ठेवू शकते. ही गोष्ट लक्षात घेत रोज संध्याकाळी आणि मुबलक प्रमाणात झाडांना पाणी दिले गेले पाहिजे, असेही रोहित सांगतात.
advertisement
7/7
उन्हाळ्यामध्ये काही झाडांना कडक उन्हाचा जास्त फरक पडत नाही. मात्र काही झाडे ही कमी उन्हाच्या ठिकाणीच योग्य प्रकारे वाढू शकतात. त्यामुळे हे देखील ओळखणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण प्रत्येक झाडाला नीट वाढवू शकू. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज मुबलक पाण्यासह पंधरा दिवसातून एकदा खत झाडांना देणे आवश्यक आहे, असे देखील रोहित यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कडक उन्हात झाडी राहातील हिरवी, अशी घ्या वेळीच काळजी, सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल