TRENDING:

आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते; ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाचा श्वास रोखला,इराणमधील घराघरांत थरकाप

Last Updated:

Donald Trump on Iran : डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणबाबतच्या धक्कादायक वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. “संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते” या इशाऱ्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक तीव्र झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन/ तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका धक्कादायक वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये इराणसंदर्भात अतिशय गंभीर आणि भीतीदायक इशारे दिले आहेत.
News18
News18
advertisement

आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते आणि ती पुन्हा कधीही उभी राहणार नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. असे होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली असली तरी ते घडण्याची शक्यता असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले. याशिवाय त्यांनी पूर्ण आणि सर्वंकष सत्तांतर (Regime Change) झाल्याचा दावा करत भविष्यात अधिक बुद्धिमान आणि कमी कट्टर विचारांचे नेतृत्व उदयास येऊ शकते, असेही संकेत दिले.

advertisement

आजची रात्र जागतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणांपैकी एक ठरू शकते. गेल्या 47 वर्षांपासून सुरू असलेल्या “खंडणी, भ्रष्टाचार आणि मृत्यूच्या युगाचा” शेवट होईल, असेही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. इराणच्या महान जनतेला आशीर्वाद देतो असे म्हणत त्यांनी पोस्टचा शेवट केला.

advertisement

ट्रम्प यांच्या या विधानामुळे मध्यपूर्वेतील आधीच तणावपूर्ण परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वक्तव्यामागील नेमका संदर्भ आणि त्याचे संभाव्य परिणाम याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी AFP च्या वृत्तानुसार सांगितले की इराणमध्ये अमेरिकेने आपली बहुतांश लष्करी उद्दिष्टे साध्य केली आहेत. ते मंगळवारी हंगेरी दौऱ्यावर होते. जिथे त्यांनी पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांना निवडणुकीपूर्वी पाठिंबा दर्शवला.

advertisement

व्हान्स म्हणाले, खूप लवकर हे युद्ध संपेल. ते कसे संपेल हे पूर्णपणे इराणवर अवलंबून आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत आम्हाला इराणकडून प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणमधील खार्ग आयलंड (Kharg Island) आणि इतर नागरी पायाभूत सुविधांवर हल्ल्यांच्या बातम्या समोर येत आहेत. तरीही इराणने माघार घेण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीनुसार, इराणने होर्मूज सामुद्रधुनी खुली केली नाही, तर त्याच्या नागरी पायाभूत सुविधांचा “पूर्ण नाश” केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

advertisement

आंतरराष्ट्रीय मध्यस्थांकडून प्रस्तावित 45 दिवसांच्या युद्धविरामाबाबतही अद्याप सहमती झालेली नाही. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की यांच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव पुढे आला होता. ट्रम्प यांनी सुरुवातीला या योजनेला महत्त्वपूर्ण प्रस्ताव म्हटले होते. मात्र नंतर तो अपुरा असल्याचे सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video
सर्व पहा

इराणी सरकारी माध्यमांनीही सांगितले की, तेहरानने हा युद्धविराम प्रस्ताव नाकारला असून संघर्षाचा ठोस शेवट होणे आवश्यक असल्याचा आग्रह धरला आहे. या प्रस्तावानुसार इराण होर्मूज सामुद्रधुनी पुन्हा खुली करेल आणि प्रत्येक जहाजाकडून सुमारे 20 लाख डॉलर शुल्क आकारेल. हे शुल्क शेजारील ओमानसोबत वाटून घेण्याचा प्रस्ताव होता, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्त दिले आहे.

मराठी बातम्या/विदेश/
आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते; ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाचा श्वास रोखला,इराणमधील घराघरांत थरकाप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल