TRENDING:

बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video

Last Updated:

सेनापती बापट रोड परिसरात वसलेले हे संग्रहालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची साक्ष देणारे जिवंत स्मारक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक महापुरुषांच्या स्मृती जतन करणारी ठिकाणे आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक हे एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी स्थळ मानले जाते. सेनापती बापट रोड परिसरात वसलेले हे संग्रहालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची साक्ष देणारे जिवंत स्मारक आहे.
advertisement

या संग्रहालयात बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग छायाचित्रांच्या माध्यमातून जिवंत केलेले पाहायला मिळतात. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह, पुणे करार, काळाराम मंदिर सत्याग्रह, भारतीय संविधानाचा मसुदा सादर करण्याचा ऐतिहासिक क्षण, तसेच त्यांचा शपथविधी आणि धर्मांतर यांसारख्या घटना येथे प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. या सर्व घटनांमुळे बाबासाहेबांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाचा सखोल आढावा येथे घेता येतो.

advertisement

संग्रहालयात बाबासाहेबांनी वापरलेल्या अनेक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे टेबल, आरामखुर्च्या, कपडे, बूट, भांडी, डायनिंग टेबल आणि अस्थी कलश यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या टेबल-खुर्चीवर बसून त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली, ती वस्तू येथे पाहायला मिळते. तसेच ज्या खुर्चीत बसून त्यांनी संविधान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले, ती ऐतिहासिक खुर्चीही येथे जतन करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस त्यांनी ज्या पलंगावर शेवटचा श्वास घेतला, तो पलंग देखील संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

advertisement

या संग्रहालयाची स्थापना 1990 साली सिंबायोसिस संस्था यांच्या वतीने करण्यात आली. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे स्मारक उभारण्यात आले. 1996 साली तत्कालीन उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. येथे सुमारे 280 वैयक्तिक वस्तू, 490 पुस्तके आणि अनेक हस्तलिखित दस्तऐवज जतन केलेले आहेत.

View More

संग्रहालयातील आणखी एक आकर्षण म्हणजे भगवान बुद्धांची मूर्ती. ही मूर्ती बाबासाहेबांच्या नित्य पूजेतील असून तिचे डोळे उघडे आहेत, हे तिचे वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांना उघड्या डोळ्यांचा बुद्ध प्रिय होता, असे सांगितले जाते. तसेच संग्रहालयात 200 पेक्षा अधिक छायाचित्रे आणि माहिती फलक आहेत, ज्यातून त्यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video
सर्व पहा

हे संग्रहालय केवळ ऐतिहासिक स्थळ नसून प्रेरणाभूमी आहे. येथे भेट दिल्यानंतर बाबासाहेबांचे विचार, त्यांचा संघर्ष आणि समाजासाठी केलेले योगदान अधिक जवळून समजते. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि सामान्य नागरिकांसाठी हे ठिकाण ज्ञान आणि प्रेरणेचे केंद्र ठरते.

मराठी बातम्या/पुणे/
बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल