पुलाव ते बिर्याणी, पारंपरिक पारशी पदार्थ खावे तर इथंच, पुण्यातील 148 वर्षे जुनं ठिकाण माहितीये?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
हे रेस्टॉरंट पुण्यामध्ये 1878 साली सुरू करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत हे सुरू आहे. पुण्यातील हे रेस्टॉरंट पारशी आहे.
advertisement
advertisement
advertisement
त्यावेळी ब्रिटिश आणि इंग्लिश ऑफिसर्स यायचे. त्यांच्यासाठी खास चहा आणि बनमस्का सर्व्ह करणे यापासून या रेस्टॉरंटची सुरुवात झाली. मात्र याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे सहा महिन्यांनी पूर्ण जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्या वेळी फूडसाठी विशेष मागणी होती आणि त्यामुळे पारशी जेवणांची सुरुवात झाली.
advertisement
advertisement
advertisement
पुण्यातील दोराबजी अँड सन्स हे केवळ एक रेस्टॉरंट नसून, पुण्याच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. हे रेस्टॉरंट सातत्याने खाद्यप्रेमींचं मन जिंकत आलं आहे. पारशी संस्कृतीची चव आणि इतिहास यांचं सुंदर मिश्रण असलेलं हे ठिकाण अनेक जण आवडीनं भेट देतात, असंही दारीयस दोराबजी यांनी सांगितले.









