'तू एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहेस', अनुष्का शर्माच्या Ex च्या प्रेमात पडला विराट कोहली, थेट जगासमोर जाहीर केलं प्रेम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
क्रिकेटचा किंग विराट कोहलीने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक मजकूर लिहित त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
1/7

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त एकच नावाची हवा आहे, ती म्हणजे 'धुरंधर २'. इंडस्ट्रीतील कलाकार असो, राजकारणी असो किंवा मग क्रीडा क्षेत्रातील दिग्गज असो, अनेकांनी या फिल्मचं भरभरून कौतुक केलेच आहे.
advertisement
2/7
अशातच खुद्द क्रिकेटचा किंग विराट कोहलीने या फिल्मचं कौतुक केलेच, पण त्याचबरोबर त्याने रणवीर सिंगचीही भरभरून प्रशंसा केली आहे.
advertisement
3/7
विराटने थेट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक मजकूर लिहित त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने फिल्मची संपूर्ण टीम, दिग्दर्शक आदित्य धर आणि अखेर रणवीर सिंगचं तोंडभरून कौतुक केलंय. त्याची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
advertisement
4/7
विराटने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे, "आज मी 'धुरंधर २' पाहिला आणि खात्रीने सांगू शकतो की, भारतात बनलेला असा 'सिनेमॅटिक अनुभव' मी यापूर्वी कधीच घेतला नव्हता. या चित्रपटाने मला प्रत्येक भावनेचा अनुभव करून दिला. तब्बल ४ तास मी जागेवरून हललो सुद्धा नाही."
advertisement
5/7
आदित्य धर आणि रणवीर सिंगला जिनियस म्हणत विराटने लिहिलं, "आदित्य धर, तुमच्या कल्पनाशक्तीला माझा सलाम! आणि रणवीर सिंग... या चित्रपटानंतर तू एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहेस. तुझा अभिनय शब्दांपलीकडचा आहे. खरोखरच, वाह!"
advertisement
6/7
इतकंच नाही, तर रणवीर सिंगची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या अनुष्का शर्मानेही या फिल्मचं कौतुक करत एक स्टोरी शेअर केली आहे. तिने लिहिलं, "४ तासांचा इतका पकड घेणारा सिनेमा बनवणं हे कठीण काम आहे. आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांशिवाय या चित्रपटाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. रणवीरने या पात्रात अक्षरशः प्राण फुंकले आहेत."
advertisement
7/7
साधारणपणे अडीच-तीन तासांचे चित्रपट पाहताना प्रेक्षक कंटाळतात, पण 'धुरंधर २' ने मात्र ४ तास प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलंय. रणवीर सिंगचा आतापर्यंतचा हा सर्वात पॉवरफुल परफॉर्मन्स मानला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तू एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहेस', अनुष्का शर्माच्या Ex च्या प्रेमात पडला विराट कोहली, थेट जगासमोर जाहीर केलं प्रेम