TRENDING:

पुलाव ते बिर्याणी, पारंपरिक पारशी पदार्थ खावे तर इथंच, पुण्यातील 148 वर्षे जुनं ठिकाण माहितीये?

Last Updated:
हे रेस्टॉरंट पुण्यामध्ये 1878 साली सुरू करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत हे सुरू आहे. पुण्यातील हे रेस्टॉरंट पारशी आहे.
advertisement
1/7
पुलाव ते बिर्याणी, पारंपरिक पारशी पदार्थ खावे तर इथंच, पुण्यातील 148 वर्षे जुनं ठिकाण माहितीये?
पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. त्यामध्ये जुन्या ठिकाणांनी आजही आपली चवीची परंपरा जपली आहे. यापैकीच एक पुण्यातील कॅम्प परिसरात वसलेलं दोराबजी अँड सन्स हे शहरातील सर्वात जुनं रेस्टॉरंट आहे.
advertisement
2/7
हे रेस्टॉरंट पुण्यामध्ये 1878 साली सुरू करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत हे सुरू आहे. पुण्यातील हे रेस्टॉरंट पारशी आहे. जे आजही आपल्या मूळ चव आणि शैलीसह टिकून आहे. या रेस्टॉरंटबद्दलचे मालक दारीयस दोराबजी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
या पारशी रेस्टॉरंटबद्दल माहिती देताना दोराबजी सांगतात की, या रेस्टॉरंटची सुरुवात माझ्या पणजोबांनी 1878 साली केली होती. त्या काळात भारतात रेस्टॉरंट्स ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती.
advertisement
4/7
त्यावेळी ब्रिटिश आणि इंग्लिश ऑफिसर्स यायचे. त्यांच्यासाठी खास चहा आणि बनमस्का सर्व्ह करणे यापासून या रेस्टॉरंटची सुरुवात झाली. मात्र याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे सहा महिन्यांनी पूर्ण जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्या वेळी फूडसाठी विशेष मागणी होती आणि त्यामुळे पारशी जेवणांची सुरुवात झाली.
advertisement
5/7
या ठिकाणी आजही पारंपरिक पारशी पदार्थ जसे की धनसाक, पुलाव, चिकन, बिर्याणी आणि माशांचे पदार्थ मिळतात. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ कोळशावर बनवले जातात.
advertisement
6/7
त्यामुळे या पदार्थाला एक खास पारंपरिक झणझणीतपणा मिळतो. या रेस्टॉरंटमध्ये आजही पारंपरिक पद्धती जपल्या जातात, असं दारीयस दोराबजी सांगतात.
advertisement
7/7
पुण्यातील दोराबजी अँड सन्स हे केवळ एक रेस्टॉरंट नसून, पुण्याच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. हे रेस्टॉरंट सातत्याने खाद्यप्रेमींचं मन जिंकत आलं आहे. पारशी संस्कृतीची चव आणि इतिहास यांचं सुंदर मिश्रण असलेलं हे ठिकाण अनेक जण आवडीनं भेट देतात, असंही दारीयस दोराबजी यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पुलाव ते बिर्याणी, पारंपरिक पारशी पदार्थ खावे तर इथंच, पुण्यातील 148 वर्षे जुनं ठिकाण माहितीये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल