TRENDING:

सोलापूरच्या गृहिणीनं काम सोपं केलं, आता 10 मिनिटांत तुम्हीही बनवू शकता पुरणपोळी, पाहा कशी?

Last Updated:
Puranpoli Premix: फक्त पाणी मिसळून गोळा करायचा आणि कणिक घेऊन पोळी लाटायची. त्यानंतर तव्यावर भाजून अवघ्या 5-10 मिनिटांत पुरणपोळी तयार होते.
advertisement
1/7
सोलापूरच्या गृहिणीनं काम सोपं केलं, आता 10 मिनिटांत तुम्हीही बनवू शकता पुरणपोळी, पाहा कशी?
महाराष्ट्रात कोणताही सण असला की पुरणपोळीचा बेत ठरलेला असतो. सध्याच्या धावपळीच्या काळात पुरणपोळी बनवण्यासाठी काही गृहिणींकडे पुरेसा वेळ नसतो. तर काहींना दाळ शिजवणं, त्याचं पुरण बनवणं मग पोळी करणं हे अवघड वाटतं. अशा गृहिणींसाठी खूशखबर आहे. सोलापूरच्या पल्लवी वाले यांच्या खास प्रयोगामुळं पुरणपोळी बनवणं सोपं होणार आहे.
advertisement
2/7
जी पुरणपोळी बनण्यासाठी तासन् तास लागायचे ती आता अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होणार आहे. सोलापूर शहरातील विजापूर रोड येथील राहणाऱ्या पल्लवी वाले यांनी खास व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे गृहिणींना पुरण बनवण्याचं टेन्शनच राहणार नाही. याबाबत पल्लवी वाले यांनीच लोकल 18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.
advertisement
3/7
पुरणपोळी सर्वांना आवडते, मात्र बनवणं अवघड वाटतं. अशा महिलांसाठी आता थेट पुरणपोळीचं प्रिमिक्स मिळणार आहे. विशेष म्हणजे वेळेची बचत, आरोग्य आणि घरगुती चव यांचा विचार करून हा प्रिमिक्स तयार केला.
advertisement
4/7
शेतकऱ्यांकडून विनापॉलिश हरभऱ्याची डाळ घेतली जाते आणि ती केमिकल-मुक्त शिजवली जाते. त्यात तेलाचा वापर न करता सेंद्रिय गूळ, हळद आणि वेलची पावडर टाकली जाते. फक्त पाणी मिसळून गोळा करायचा आणि कणिक घेऊन पोळी लाटायची. त्यानंतर तव्यावर भाजून अवघ्या 5-10 मिनिटांत पुरणपोळी तयार होते.
advertisement
5/7
विशेष म्हणजे पल्लवी यांनी कटाची आमटीचा प्रिमिक्सही बनवलं आहे. त्यात कट, गूळ, चिंच, मसाले, कढीपत्ता पावडर, तिखट-मीठ असून, तेलाची फोडणी देऊन त्यामध्ये पाणी टाकायचं. अवघे 10 मिनिट उकळलं की कटाची आणटी तयार होते. त्यामुळे गृहिणींना अगदी टेस्टी अशी कटाची आमटीही सोप्या पद्धतीनं बनवता येते.
advertisement
6/7
अगदी घरगुती स्वरुपात पल्लवी यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्याला मागणी वाढत गेली. आता पुरणपोळीच्या प्रिमिक्सचे पाकीट किंमत 150 ते 800 रुपयांपर्यंत मिळतं. यामधून पल्लवी यांची महिन्याची कमाई 1 लाख रुपयांपर्यंत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, उच्चशिक्षित पल्लवी यांनी नोकरी पेक्षा आवडीच्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं. घरामध्ये सुरू केलेल्या या व्यवसायाने पल्लवी यांनी महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. तसेच धावपळीतही महाराष्ट्रीय स्वाद जपण्याचा हा प्रयत्न लोकप्रिय देखील ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
सोलापूरच्या गृहिणीनं काम सोपं केलं, आता 10 मिनिटांत तुम्हीही बनवू शकता पुरणपोळी, पाहा कशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल