TRENDING:

10 एप्रिलला मध्यरात्री काही तरी घडणार, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; कोणाची झोप उडणार?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात मीन ही बुधाची 'नीच' रास मानली जाते, म्हणजेच येथे बुधाची शक्ती क्षीण होते. मात्र, याच काळात मीन राशीत आधीच विराजमान असलेल्या ग्रहांमुळे 'नीचभंग राजयोग' तयार होत आहेत.
advertisement
1/7
10 एप्रिलला मध्यरात्री काही तरी घडणार, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; कोणाची झोप उडणार?
ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह आपली रास बदलणार आहे. येत्या 11 एप्रिल 2026 रोजी पहाटे 01:20 मिनिटांनी बुध कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात मीन ही बुधाची 'नीच' रास मानली जाते, म्हणजेच येथे बुधाची शक्ती क्षीण होते. मात्र, याच काळात मीन राशीत आधीच विराजमान असलेल्या ग्रहांमुळे 'नीचभंग राजयोग' आणि 'बुधादित्य योग' देखील तयार होत आहेत. बुधाचे हे राशी परिवर्तन 30 एप्रिल 2026 पर्यंत राहील.
advertisement
2/7
मेष - खर्चात वाढ आणि मानसिक ताण: बुधाचे हे गोचर तुमच्या राशीच्या बाराव्या भावात होणार आहे. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. बोलताना संयम ठेवा, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी वाद होऊ शकतात. गुंतवणूक करताना सावध राहा आणि महत्त्वाचे निर्णय सध्या लांबणीवर टाका.
advertisement
3/7
वृषभ - आर्थिक लाभ आणि प्रगती: नीच राशीत असूनही बुध तुम्हाला शुभ फळ देईल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असून व्यापारी वर्गाला नवीन संधी मिळतील. 'नीचभंग राजयोगा'मुळे तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडतील.
advertisement
4/7
मिथुन - नोकरीत बदल आणि धावपळ: मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे. तुमच्या राशीच्या दहाव्या भावात हे गोचर होणार असल्याने नोकरीच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहू शकतात. मात्र, मेहनतीचे फळ नक्की मिळेल. कामाचा ताण वाढल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
5/7
कर्क - नशिबाची साथ आणि आध्यात्मिक ओढ: कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. धार्मिक कार्यात तुमची ओढ वाढेल. लांबच्या प्रवासाचे योग असून रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. वडिलांकडून किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला मोलाचे सहकार्य लाभेल.
advertisement
6/7
सिंह - आरोग्याची काळजी आणि गुप्त शत्रू: बुधाचे हे संक्रमण तुमच्या आठव्या भावात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. विशेषतः त्वचा किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहा आणि तुमचे प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. शेअर बाजारात मोठी जोखीम घेऊ नका.
advertisement
7/7
कन्या - भागीदारीत लाभ आणि वैवाहिक सुख: कन्या राशीचा स्वामी बुध असून तो तुमच्या सातव्या भावात प्रवेश करेल. व्यवसायात भागीदाराशी संबंध सुधारतील आणि नवीन करार होऊ शकतात. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. 'बुधादित्य योगा'मुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
10 एप्रिलला मध्यरात्री काही तरी घडणार, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; कोणाची झोप उडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल