TRENDING:

Shocking Incident : सैतानी कृत्य! मुलांच्या किंकाळ्यांनी भिवंडी हादरली; कैऱ्या तोडणाऱ्यांना अमानुष शिक्षा

Last Updated:

Bhiwandi Shocking Crime : उन्हाळा सुरु होताच लहान मुलं अनेक ठिकाणी कैऱ्या तोडण्यासाठी जातात. मात्र यातून भिवंडी शहरातून भयंकर प्रकार समोर आलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भिवंडी : उन्हाळ्याच्या सुट्टीत झाडावरच्या कैऱ्या तोडण्याचा मोह कोणत्याही मुलांना राहवत नाही. मात्र भिवंडीत राहणाऱ्या चार लहान मुलांना ते चांगलेच महागात पडले आहे. केवळ कैऱ्या तोडल्या या क्षुल्लक कारणावरुन एका निर्दयी मालकाने आपल्या साथीदारांसह त्या चार अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण केली आहे की मुले जागीच बेशुद्ध पडले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
News18
News18
advertisement

नेमका प्रकार घडला काय?

मिळालेल्या माहितीनुसार,भिवंडीतील चाविंद्रा येथील भागात विलास पाटील यांच्या ही मालकीची जागा आहे. या जागेत असलेल्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या आहेत. त्यामुळे अवचितपाडा येथील चार मुले या कैऱ्या तोडण्यासाठी गेले होते. ही मुलं कैऱ्या तोडत असल्याचे मालक विलास पाटील यांनी पाहिले आणि त्यांचा पारा चढला. विलास यांनी कोणताही विचार न करता त्यांच्या साथीदारांच्या मदतीने त्या मुलांचा पाठलाग गेला आणि त्यांना पकडून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.

advertisement

मुलांची प्रकृती चिंताजनक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षे उद्योगात क्रांती होणार, पुणेकर शास्त्रज्ञांचा खास शोध, कसा आणि कुणाला फायदा? Video
सर्व पहा

मालकाने केलेली ही मारहाण इतकी भीषण होती की चारही मुले बेशुद्ध पडले. यामध्ये एका मुलाचा पायही फॅक्चर झाला असून तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी सर्व प्रकार पाहताच मुलांना तातडीने एका रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातकाळ दखल घेत मुख्य आरोपी विलास पाटीलवर गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : सैतानी कृत्य! मुलांच्या किंकाळ्यांनी भिवंडी हादरली; कैऱ्या तोडणाऱ्यांना अमानुष शिक्षा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल