IND vs PAK हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानी खेळाडू बरळला, 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात, नेमकं काय म्हणाला?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानी खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंना उसकवण्याचे प्रयत्न सूरू झाले आहेत. या दरम्यान पाकिस्तानच्या एका वादग्रस्त खेळाडूने मोठं विधान केलं आहे.
advertisement
1/7

श्रीलंकेतील कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.
advertisement
2/7
या सामन्याआधी पाकिस्तानी खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंना उसकवण्याचे प्रयत्न सूरू झाले आहेत. या दरम्यान पाकिस्तानच्या एका वादग्रस्त खेळाडूने मोठं विधान केलं आहे.
advertisement
3/7
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उस्मान तारीक आहे. त्याने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. या त्याच्या कामगिरीनंतर त्याच्या गोलंदाजीवरून पुन्हा वाद सूरू झाला आहे.
advertisement
4/7
उस्मान तारिकने कोपर वाकवून गोलंदाजी केल्याबद्दल दोनदा तक्रार करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याला गोलंदाजी करण्यास परवानगी दिली आहे.
advertisement
5/7
दरम्यान त्याच्या या अॅक्शनवरून भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आक्षेप असल्याचा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला, मला वाटतं त्यांच्यावर (भारतावर) अतिरीक्त दबाव असेल. कारण ज्या प्रकारे ते माझ्या अॅक्शनवर चर्चा करत आहेत, असे उस्मान तारीक म्हणाला.
advertisement
6/7
तसेच ते फक्त त्याच्यावर (बॉलिंग अॅक्शनवर) चर्चा करत आहेत. म्हणजे ते फक्त त्यावरच आक्षेप घेत आहेत, त्यामुळे कदाचित त्यांच्यावर अतिरिक्त दबाव आहे असे दिसून येते,असे उस्मान तारीक बोलला आहे.
advertisement
7/7
"मला त्याबद्दल माहिती नाही. मी खरोखर माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले आहे. मला मीडियामध्ये किंवा इतर कशातही काय चालले आहे याची काहीच कल्पना नाही. ही एक साधी बाब आहे, मी फक्त माझ्या क्रिकेट आणि सरावावर लक्ष केंद्रित करत आहे,असेही तो पुढे म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानी खेळाडू बरळला, 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात, नेमकं काय म्हणाला?