TRENDING:

नुकतीच संपली मालिका, अभिनेत्यानं दणक्यात केलं लेकाचं बारसं; बायकोनं हटके स्टाइलनं सांगितलं नाव

Last Updated:
साधी माणसं मालिकेतील सत्याने खऱ्या आयुष्यात लेकाचं बारसं केलं. नाव देखील हटके ठेवलं आहे.
advertisement
1/8
नुकतीच संपली मालिका, अभिनेत्यानं  दणक्यात केलं लेकाचं बारसं; बायकोनं हटके स्टाइलनं सांगितलं नाव
मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार लग्न करत आहेत. अनेकांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रसिद्ध अभिनेता आकाश नलावडे याच्या घरी देखील सेलिब्रेश झालं.
advertisement
2/8
आकाश काही दिवसांआधीच बाबा झाला. आकाशला मुलगा झाला. आकाश आणि त्याची पत्नी रुचिका यांनी नुकतंच मुलाचं बारसं केलं. आकाशच्या बायकोनं एका हटके स्टाइलनं मुलाचं नाव सगळ्यांना सांगितलं.
advertisement
3/8
अभिनेता आकाश नलावडे स्टार प्रवाहच्या 'साधी माणसं' या मालिकेत काम करत होता. ही मालिका काही दिवसांआधीच संपली. मालिकेच्या शेटवचा एपिसोडही टेलिकास्ट झाला. मालिका संपताच आकाशने लेकाचं थाटात बारसं केलं.
advertisement
4/8
आकाशची पत्नी रुचिका हिनं उखाणा घेत मुलाचं नाव सगळ्यांना सांगितलं. सध्या बारसं म्हटलं की सगळ्यांच्या पोटात गोळा येतो.
advertisement
5/8
बाळाचं नाव काय असणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. सध्याच्या ट्रेडिंग नावांपेक्षा आकाश आणि रुचिका यांच्या बाळाचं नाव वेगळं आहे.
advertisement
6/8
रुचिकानं उखाणा घेत बाळाचं नाव सांगितलं. ती म्हणाली, "मनावर केलाय माझ्या आकाशने राज, त्याच्याच पाऊल ठेवेल आणि राज्य करेल माझा अधिराज." आकाश आणि रुचिका यांनी त्यांच्या मुलाचं नाव 'अधिराज' असं ठेवलं आहे.
advertisement
7/8
अधिराजच्या बारशासाठी साधी माणसं मालिकेच्या टीमनेही हजेरी लावली होती. अभिनेत्री सुप्रिया पाठारे म्हणजेच मालिकेतील सत्याची आई, आजी, वहिनी बारशाला आले होते.
advertisement
8/8
आकाशा आणि रुचिका जानेवारी महिन्यात आई - बाबा झाले. त्याआधी डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत त्यानं आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नुकतीच संपली मालिका, अभिनेत्यानं दणक्यात केलं लेकाचं बारसं; बायकोनं हटके स्टाइलनं सांगितलं नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल