TRENDING:

Ideal Protein Intake : जिम करून झाल्यावर किती वेळेमध्ये प्रोटीन घ्यावं? वयानुसार आहारात किती असावं प्रमाण?

Last Updated:
बऱ्याचदा काही लोकांना आपण प्रोटीन कधी घ्यावं? जिमवरून आल्यानंतर घ्यावं की आधी? शिवाय किती प्रमाणात ते घ्यावं हे कळत नाही. पण प्रोटीनची रोजची गरज तर पूर्ण व्हायला हवी.
advertisement
1/9
जिम करून झाल्यावर किती वेळेमध्ये प्रोटीन घ्यावं? वयानुसार आहारात किती असावं प्रमाण?
प्रोटीन आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला शरीराला रोजच्या रोज प्रोटीनची आवश्यकता असते. पण साधारणपणे जी लोकं जिम करतात त्यांना प्रोटीनची गरज जास्त पडते. कारण त्यांना त्यांचे मसल्स वाढवायचे असतात.
advertisement
2/9
पण बऱ्याचदा काही लोकांना आपण प्रोटीन कधी घ्यावं? जिमवरून आल्यानंतर घ्यावं की आधी? शिवाय किती प्रमाणात ते घ्यावं हे कळत नाही. पण प्रोटीनची रोजची गरज तर पूर्ण व्हायला हवी. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं यासाठी गरजेचं आहे.
advertisement
3/9
आपण किती प्रमाणात प्रोटीन खावं हे आपल्या शरीराच्या गरजा, लिंग आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. मात्र जिम करणाऱ्या लोकांना त्याची जात गरज असते. जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये एक समाज आहे की, व्यायामानंतर 30 मिनिटांच्या आत प्रोटीन शेक प्यायलाच हवं. पण सत्य आहेका? चला पाहूया.
advertisement
4/9
आजतकने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 3,000 प्रौढांच्या एका मोठ्या अभ्यासात असं दिसलंय की, स्नायू म्हणजेच मसल्सच्या वाढीसाठी तुम्ही व्यायामानंतर लगेच प्रोटीन घेता की काही तासांनंतर, याने काही फरक पडत नाही. जास्त महत्त्वाचं हे आहे की, तुम्ही दिवसभरात शरीराला किती प्रोटीन पुरवता.
advertisement
5/9
दिवसभराच्या आहारातून शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळाल्यास मसल्सची वाढ आणि दुरुस्ती चांगली होते. तज्ञांच्या मते, व्यायामानंतर 30 मिनिटांच्या आत प्रोटीन खायला हवं. पण तुमच्या एकूण प्रोटीनचं इंटक दिवसभराच्या आहारामध्ये विभागून घेणं उत्तम आहे.
advertisement
6/9
तुमच्या प्रत्येक जेवणात अंदाजे 25 ते 30 ग्रॅम प्रोटीनचा समावेश केल्याने तुमची पचनक्रिया सक्रिय राहते आणि भूक नियंत्रणात राहते. एखादेवेळी तुम्ही उपाशीपोटी व्यायाम केला असेल, तर व्यायामानंतर 1-2 तासांच्या आत प्रोटिन्स खाल्ल्याने शरीराच्या रिकव्हरीसाठी ते फायदेशीर ठरतं.
advertisement
7/9
वाढत्या वयानुसार मसल्स कमकुवत होऊ लागतात. म्हणूनच तरुणांपेक्षा 40 वर्षांवरील व्यक्तींसाठी प्रोटीन घेण्याची वेळ अधिक महत्त्वाची आहे. नाश्ता आणि दुपारच्या जेवणात चांगल्या प्रमाणात प्रोटीन घ्याल हवं. अशा लोकांनी झोपण्यापूर्वी दूध किंवा कॉटेज चीज असे हळू पचणारे प्रोटीन घ्यावे. याने मसल्सच्या रिकव्हरीमध्ये मदत होऊ शकते.
advertisement
8/9
तज्ञांच्या मते, रोजच्या आहारातील एकूण प्रोटीनकडे लक्ष द्या. तुमच्या वजनानुसार आणि शारीरिक हालचालींनुसार प्रोटीन किती घ्यायचा हे ठरवा. हवं तर यासाठी जिम ट्रेनरची किंवा तज्ज्ञांची मदत घ्या.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ideal Protein Intake : जिम करून झाल्यावर किती वेळेमध्ये प्रोटीन घ्यावं? वयानुसार आहारात किती असावं प्रमाण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल