पंजाब किंग्जचा दुसरा गुन्हा अन् कारवाई
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (Code of Conduct) पंजाबचा या सीजनमधील हा दुसरा गुन्हा ठरला आहे. आर्टिकल 2.22 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून श्रेयस अय्यरला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड भरवावा लागणार आहे. मॅच जिंकूनही ओव्हर-रेटच्या नियमाचे उल्लंघन करणं पंजाबच्या टीमला भारी पडल्याचं पहायला मिळतंय. मॅचमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगचा अवधी समाप्त झाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
संपूर्ण टीमसह इम्पॅक्ट प्लेयरवरही कारवाई
या दंडाचा फटका केवळ कॅप्टनलाच बसला नसून संपूर्ण प्लेइंग इलेव्हनलाही त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. यामध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा देखील समावेश करण्यात आला आहे. टीममधील प्रत्येक सदस्याला 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल तितका दंड भरावा लागणार आहे. यापूर्वीच्या गुजरातविरुद्धच्या मॅचमध्येही पंजाबकडून अशाच प्रकारची चूक झाली होती.
श्रेयस अय्यरवर सस्पेंशनची टांगती तलवार
दरम्यान, वारंवार होणाऱ्या या चुकांमुळे आगामी मॅचमध्ये श्रेयस अय्यरवर सस्पेंशनची टांगती तलवार असू शकते. सलग तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कॅप्टनवर एका मॅचची बंदी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंजाब किंग्स आगामी सामन्यांमध्ये वेळेचे नियोजन कसं करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. श्रेयस अय्यरला अर्शदीपला वॉर्निंग द्यावी लागणार आहे.
