Rashmika Pregnant : खरंच रश्मिका-विजय होणार आईबाबा; अभिनेत्रीच्या 'आम्ही तीन झालो' पोस्टचा नेमका अर्थ काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda : अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लेटेस्ट पोस्टमुळे ती प्रेग्नंट आहे आणि विजय देवरकोंडाच्या घरी नवा पाहुणा येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. पण...
advertisement
1/9

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा दोघंही सध्या चर्चेत आहेत ते गूड न्यूजमुळे. रश्मिकाने एक पोस्ट केली, ज्यामुळे या कपलची चर्चा होते आहे.
advertisement
2/9
रश्मिकाची ही पोस्ट म्हणजे प्रेग्नन्सीसंबंधीची हिंट देण्यासारखी आहे. त्यामुळे लग्नानंतर एक महिन्यानी रश्मिका प्रेग्नंट असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली.
advertisement
3/9
रश्मिकाने तिच्या पोस्टला 'आता आम्ही तीन झालो', असं कॅप्शन दिलं आहे. तसंच पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता कार्टुन रूपातील रश्मिका, विजय आणि त्यांच्यासोबत एक फूल दिसतं आहे. या पोस्टला रश्मिकाने हार्ट इमोजीही लावले आहेत.
advertisement
4/9
ही पोस्ट पाहिल्यानंतर रश्मिका-विजयचे चाहते शॉक झाले आहेत. रश्मिका प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधत अनेकांनी कपलचं अभिनंदन केलं आहे.
advertisement
5/9
पण खरंच रश्मिका-विजय यांची ही गूड न्यूज म्हणजे प्रेग्नन्सीसंबंधीच आहे का? कारण रश्मिका आणि विजय यांनी या पोस्टमध्ये थेटपणे प्रेग्नन्सीचा उल्लेख केलेला नाही किंवा त्याबाबत अधिकृतरित्या कुठेच सांगितलेलं नाही.
advertisement
6/9
तसंच जर तुम्ही रश्मिकाची पोस्ट पाहाल तर तिने यासोबत आणखी दोन इन्स्टाग्राम अकाऊंट जोडले आहेत. यातील एक अकाऊंट हे रश्मिकाचंच आहे रश्मिका आणि रू असं त्याचं नाव. जिथं तिचे नुकत्याच पोस्ट केलेल्या फुलासोबतचेच कितीतरी कार्टुन अवतारातील व्हिडीओ आहेत. रश्मिकाचं हे अकाऊंट लग्नाच्या आधीपासूनच आहे.
advertisement
7/9
रश्मिकाचा आताचा व्हिडीओ नीट पाहाल तर त्यात सुरुवातीला रश्मिका आणि फुल दोघं दिसत आहेत आणि नंतर त्यांच्यामध्ये विजय येताना दिसतो.
advertisement
8/9
एकंदर सगळा अर्थ लावायचा झाला तर रश्मिका आणि तिचा काल्पनिक पार्टनर म्हणजे ते फूल हे दोघं यांचं हे जग होतं आणि आता त्यांच्यात तिसरा विजय आला. म्हणजे 'आम्ही तीन झालो', असा निघतो.
advertisement
9/9
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2025 ला लग्न केलं. उदयपूरमध्ये खासगी विवाहसोहळ्यात अगदी शाही थाटात त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा आला एक महिना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच हे कपल थायलंडमध्ये हनीमूनला गेलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Pregnant : खरंच रश्मिका-विजय होणार आईबाबा; अभिनेत्रीच्या 'आम्ही तीन झालो' पोस्टचा नेमका अर्थ काय?