Shreyas Iyer : ज्याची भीती होती तेच होणार! BCCI घालणार श्रेयस अय्यरवर बंदी, IPL चा एक नियम पडणार भारी
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer ban for one match In IPL 2026 : श्रेयस अय्यरने पहिल्या दोन मॅचमध्येच दोनदा अशा चुका केल्या आहेत. अशातच वारंवार होणाऱ्या या चुकांमुळे आगामी मॅचमध्ये श्रेयस अय्यरवर सस्पेंशनची टांगती तलवार असू शकते.
advertisement
1/7

आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्जने दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवला अन् दमदार सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर याला दोन्ही मॅचनंतर धक्का बसलाय.
advertisement
2/7
बीसीसीआयने वर पहिल्या मॅचनंतर 12 लाख तर आता दुसऱ्या मॅचनंतर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटने बॉलिंग केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीये.
advertisement
3/7
श्रेयस अय्यरने पहिल्या दोन मॅचमध्येच दोनदा अशा चुका केल्या आहेत. अशातच वारंवार होणाऱ्या या चुकांमुळे आगामी मॅचमध्ये श्रेयस अय्यरवर सस्पेंशनची टांगती तलवार असू शकते.
advertisement
4/7
आयपीएलच्या नव्या नियमानुसार, सलग तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कॅप्टनवर एका मॅचची बंदी लावली जाऊ शकते. पण हा निर्णय सर्वस्व बीसीसीआयच्या हातात असेल.
advertisement
5/7
मागील आयपीएल हंगामातील पहिल्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यावर एका मॅचच्या बंदीची कारवाई झाली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवने एका मॅचसाठी मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी केली होती.
advertisement
6/7
पंजाब किंग्जला दोन्ही मॅचमध्ये अशी वेळ का आली? याचं उत्तर आहे... अर्शदीप सिंग... अर्शदीप सिंग याने दोन्ही मॅचमध्ये वाईडचे बॉल पकडून पाच पाच ओव्हर टाकल्या आहेत. तिथं पंजाबचा टाईम वेस्ट झाला.
advertisement
7/7
दरम्यान, फास्टर बॉलरपेक्षा स्पिनर्स बॉलर ओव्हर पूर्ण करायला कमी वेळ घेतो. पण पंजाब किंग्ज एकाच स्पिनर्सच्या भरोश्यावर खेळत आहे. पंजाब किंग्जकडे दुसरा स्पिनर्सचा पर्यायच नसल्याने त्यांना वेळ जास्त घ्यावा लागतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : ज्याची भीती होती तेच होणार! BCCI घालणार श्रेयस अय्यरवर बंदी, IPL चा एक नियम पडणार भारी