TRENDING:

Honey Singh : आधी मुंबईतील शो वादात, नंतर गाणं हटवलं आता पुण्यातही यो यो हनी सिंग अडचणीत; पोलिसांची नोटीस, प्रकरण काय?

Last Updated:
Honey Singh : यो यो हनी सिंगच्या अडचणी वाढतच झालल्या आहेत. मुंबईतील शो वादात आल्यानंतर कोर्टाने त्याचं एक गाणं हटवलं आणि आता पुण्यातील शोआधी पोलिसांनी त्याला झटका दिला आहे.
advertisement
1/9
आधी मुंबईतील शो वादात, नंतर गाणं हटवलं आता पुण्यातही हनी सिंग अडचणीत; पोलिसांची नोटीस, प्रकरण काय?
सिंगर यो यो हनी सिंग गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. सुरुवातीला त्याचा मुंबईतील शो वादात आला, त्यानंतर कोर्टाने त्याचं एक गाणं हटवलं आणि आता पुणे पोलिसांनीही त्याला झटका दिला आहे.
advertisement
2/9
हनी सिंहचा पुण्यात शो होणार आहे. हा शो 4 एप्रिल रोजी होणार होता, पण खराब हवामानामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हा शो 18 एप्रिल, 2026 रोजी आयोजित केला जाईल.
advertisement
3/9
दरम्यान हनी सिंगचा हा शो होण्याआधीच पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे. पत्रात हनी सिंगच्या गाण्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच्याच गाण्यात दारू, अमली पदार्थ आणि गन अशा गोष्टींचा उल्लेख असतो, अशा गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
4/9
पत्रात म्हटलं आहे की, हनीच्या 'वन बॉटल डाउन', 'चार बॉटल वोडका', 'मनाली ट्रान्स', 'दिस पार्टीज गेटिंग हॉट', 'मखना', 'गोलियों' आणि 'मिलियनेअर' यासारख्या गाण्यांमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे.
advertisement
5/9
तसंच या पत्रात 28 मार्च रोजी मुंबईत झालेल्या त्याच्या शोचाही उल्लेख केला आहे. हा शो हनी सिंगच्या 'माय स्टोरी टूर'चा एक भाग होता, ज्यामध्ये 'मिलियनेअर', 'देसी कलाकार', 'माफिया मुंडीर' आणि 'डोप शॉप' यांसारखी गाणी सादर करण्यात आली होती. यात अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला होता.
advertisement
6/9
त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमाचा आशय सामाजिकदृष्ट्या जबाबदार, कायदा आणि बाल सुरक्षेच्या नियमांनुसार असेल, हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत, अशी विनंती या पत्रातून पोलीस आयुक्तांना करण्यात आली होती.
advertisement
7/9
याआधी हनी सिंहचा मुंबईतील शोही वादात सापडला होता. 28 मार्च रोजी वांद्र्यातील एमएमआरडीए मैदानावर हा शो झाला. शो दरम्यान हनी सिंग दारू पिताना दिसला. तसंच मुंबई विमानतळाजवळील संवेदनशील परिसरात परवानगीशिवाय लेझर लाईट्स वापरण्यात आले.  यामुळे विमानांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकला असता, असा आरोप करत शोच्या आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
advertisement
8/9
तसंच हनी सिंह आणि बादशहा या जोडीचं 20 वर्षांपूर्वींच एक गाजलेलं गाणं ट्यूब, स्पॉटिफाई आणि इतर सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले.
advertisement
9/9
2005-06 साली रिलीज झालेलं 'माफिया मुंडीर' हे गाणं यात नको ते शब्द वापण्यात आल्याने कोर्टाने या जोडीला चांगलंच सुनावलं
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Honey Singh : आधी मुंबईतील शो वादात, नंतर गाणं हटवलं आता पुण्यातही यो यो हनी सिंग अडचणीत; पोलिसांची नोटीस, प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल