Induction खरेदी करताना फक्त लूक पाहता? या 4 गोष्टींवरही द्या लक्ष, होईल फायदाच फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Induction Buying Guide: एलपीजी सिलेंडरचे दर प्रचंड वाढले आहेत. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम म्हणून देशातील पुरवठ्यावर परिणाम झालाय. याच कारणामुळे इंडक्शन कुकटॉप खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
advertisement
1/5

मुंबई : एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झालीये. याच कारणामुळे आता लोकं इंडक्शन कुकटॉप खरेदी करत आहेत. किचनमध्ये दूध गरम करणे, जेवण शिजवणे, चहा बनवणे अशा कामांसाठी इंडक्शन कूकटॉप खुप फायदेशीर ठरते. इंडक्शन खरेदी करताना फक्त त्याचा लूक पाहून ते खरेदी करणं चुकीचं ठरू शकतं. ज्यामुळे आणखी कोणत्या 5 गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊया.
advertisement
2/5
पॉवर रेटिंग चेक करा : इंडक्शन कुकटॉपची पॉवर रेटिंगवरुन कळतं की, ते कुकवेयरला किती वेळात गरम करू शकते. बाजारात मिळणारे जास्तीत जास्त मडल्स 1200W आणि 2000W दरम्यान असू शकतात. जास्त वॉटचे कुकटॉप सामान्यतः वेगाने अन्न शिजवतात.
advertisement
3/5
कुकिंग मोड्सवर लक्ष द्या : इंडक्शन कुकटॉप खरेदी करताना बारीक गोष्टी बघून घ्या. कारण हे कुकिंग मोड्ससह येते. तुम्ही हे आधी पाहिले नाही तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. इंडक्शन कूकटॉपमध्ये पहिलेच सेट कुकिंग ऑप्शन्स असतात. बॉयलिंग, फ्राइंग, राइस, मिल्क, चपाती इत्यादी.
advertisement
4/5
सेफ्टी फीचर्सवर लक्ष द्या : इंडक्शन कुकटॉप खरेदी करण्यापूर्वी तुम्ही जे मॉडल निवडताय त्यात कोणकोणते सेफ्टी फीचर्स आहेत ते चेक करा. इंडक्शन कुकटॉप सामान्यतः लोकांना ऑटो शट-ऑफ, ओव्हरहीट प्रोटेक्शन, चाइल्ड लॉक आणि पॅन डिटेक्शनसारखे सेफ्टी फीचर्ससह येतात. हे फीचर्स असणारे मॉडल निवडा.
advertisement
5/5
भांड्याची कम्पॅटिबिलिटी चेक करा : इंडक्शन कुकटॉप विशेषतः मॅग्नेटिक मटीरियलच्या कुकवेयरसह काम करण्यासाठी डिझाइन केलेय. यात स्टेनलेस स्टील आणि कास्ट आयरनचा समावेश असतो. अॅल्यूमीनियम, कॉपर किंवा ग्लासने तयार भांडे हे इंडक्शन कुकिंगसाठी डिझाइन केलेले असतील तरच काम करतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Induction खरेदी करताना फक्त लूक पाहता? या 4 गोष्टींवरही द्या लक्ष, होईल फायदाच फायदा