TRENDING:

एकाच नावाच्या 3 फिल्म्स एकाच OTT वर एकत्र ट्रेंड! TOP 10 Trending च्या यादीत, असं यात आहे काय?

Last Updated:
OTT Trending Film : 53 कोटींचं जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि 50 दिवस थिएटरमध्ये राहिल्यानंतर ही फिल्म ओटीटीवर रिलीज होताच. त्याच नावाच्या इतर दोन फिल्मही ट्रेंड होणं म्हणजे बॉलिवूडच्या इतिहासातील एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद क्षण आहे.
advertisement
1/7
एकाच नावाच्या 3 फिल्म्स एकत्र OTT वर ट्रेंडिंग! TOP 10 ट्रेंडच्या यादीत, असं यात आहे काय?
एकच नाव असलेल्या कितीतरी फिल्म्स आहेत. काही वेगवेगळ्या स्टोरीवर आधारित तर काही त्याच फिल्म्सचा सीक्वेल. एकच नाव असलेल्या फिल्म्सना वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो. एखादी हिट ठरते, तर एखादी फेल.
advertisement
2/7
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एकाच नावाच्या 3 फिल्म्स ज्या एकाच ओटीटीवर एकत्र ट्रेंड करत आहेत. ओटीटीच्या टॉप 10 ट्रेंडिंग फिल्म्सच्या यादीत या तिन्ही फिल्म्स आहेत. एकाच नावाच्या तीन फिल्म्स एकाच वेळी ट्रेंड होणं म्हणजे बॉलिवूडच्या इतिहासातील एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद क्षण आहे.
advertisement
3/7
काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेली ही फिल्म. जी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. फिल्मने भारतात 53 कोटींहून अधिक कमाई केली. जी आजपर्यंतच्या संपूर्ण फ्रँचायझीमधील सर्वाधिक कमाई आहे. ज्या काळात मोठे चित्रपट अनेकदा दोन आठवड्यांतच थिएटरमधून निघून जातात, त्या काळात ही फिल्म  50 दिवस थिएटरमध्ये टिकून राहिली.
advertisement
4/7
जेव्हा एखादा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये हिट होतो, तेव्हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर त्याची मागणी प्रचंड वाढते. फिल्मचा तिसरा पार्ट असलेली ही फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आणि ती नेटफ्लिक्स इंडियावर टॉप 10 मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली. यानंतर फिल्मचे आधीचे दोन भागही टॉप ट्रेंडमध्ये आले. तिसऱ्या भागाच्या प्रचंड लोकप्रियतेने प्रेक्षकांना जुन्या चित्रपटांकडेही आकर्षित केले आहे.
advertisement
5/7
ही फिल्म आहे मर्दानी. मर्दानी 3, मर्दानी 2 आणि मर्दानी या तिन्ही फिल्म्स एकाच वेळी एकत्र टॉप 10 मध्ये आहेत.दिग्दर्शक अभिराज मिनावाला आणि निर्माता आदित्य चोप्रा यांची मर्दानी 3 फिल्म. ज्यात राणी मुखर्जीची पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत आहे. जी निर्भीड, प्रामाणिक आहे आणि समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असते.
advertisement
6/7
बॉलिवूडमध्ये अनेकदा असं म्हटलं जातं की सीक्वेलचं युग फक्त पुरुष कलाकारांच्या अॅक्शन चित्रपटांपुरतंच मर्यादित आहे, पण राणी मुखर्जीने केवळ या कल्पनेला आव्हानच दिलं नाही, तर ती पूर्णपणे मोडीत काढली आहे. यशराज फिल्म्सच्या सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी महिला-प्रधान फ्रँचायझी, 'मर्दानी'ने डिजिटल विश्वात असं यश मिळवलं आहे, ज्याचं स्वप्न बडे बडे सुपरस्टार पाहतात.
advertisement
7/7
टॉप 10 यादीत एकाच फ्रँचायझीच्या तिन्ही चित्रपटांचे वर्चस्व हे सिद्ध करते की शिवानी शिवाजी रॉय हे पात्र प्रेक्षकांच्या मनात किती खोलवर रुजले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकाच नावाच्या 3 फिल्म्स एकाच OTT वर एकत्र ट्रेंड! TOP 10 Trending च्या यादीत, असं यात आहे काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल