TRENDING:

जिकडे तिकडे पाणीच पाणी! BMW पाण्यात बुडाली, पुण्यात आला 'पूर', PHOTOS

Last Updated:
गुरुवारी सकाळपासूनच शहरात उकाडा जाणवत होता आणि दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
advertisement
1/7
जिकडे तिकडे पाणीच पाणी! BMW पाण्यात बुडाली, पुण्यात आला 'पूर',  PHOTOS
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आजही जोरदार हजेरी लावत संपूर्ण पुणे शहराला झोडपून काढले. गुरुवारी सकाळपासूनच शहरात उकाडा जाणवत होता आणि दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
advertisement
2/7
भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
3/7
आज झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका शहरातील सखल भागांना बसला. कोंडवा, उत्तमनगर, दापोडी, सिंहगड रोड, कोथरूड तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही भागांत रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याचे पाहायला मिळालं.
advertisement
4/7
पावसामुळे अनेक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी पाण्यात अडकून वाहनं बंद पडल्याच्या घटना समोर आल्या.
advertisement
5/7
त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागली. कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झालेले पाहायला मिळत आहे.
advertisement
6/7
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
7/7
विशेषतः सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, अवकाळी पावसामुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
जिकडे तिकडे पाणीच पाणी! BMW पाण्यात बुडाली, पुण्यात आला 'पूर', PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल