Window Vs Split AC : स्प्लिट एसी चांगला की विंडो एसी? तुम्हालाही पडलाय प्रश्न? तज्ज्ञांनी दिलं बेस्ट सोल्युशन
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Summer Tips : घरासाठी एसी विकत घेताना त्याची किंमत, त्याचे फीचर्स सर्वकाही आपण पाहतो. मात्र सर्वात आधी एक प्रश्न पडतो. तो म्हणजे, कोणता एसी चांगला स्प्लिट एसी की विंडो एसी?
advertisement
1/9

उन्हाळ्यात घराबाहेरच काय तर बऱ्याचदा घरातही बसणं अवघड होऊन जातं. अशा कडक उन्हाच्या दिवसांत आपल्याला केवळ पंख्यामध्ये दिवस काढणं शक्यता होत नाही. म्हणून काही लोक कुलरचा पर्याय निवडतात तर काही बरेच लोक एसी बसवून घेतात.
advertisement
2/9
घरासाठी एसी विकत घेताना त्याची किंमत, त्याचे फीचर्स सर्वकाही आपण पाहतो. मात्र सर्वात आधी एक प्रश्न पडतो. तो म्हणजे, कोणता एसी घेणं आपल्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल, स्प्लिट एसी की विंडो एसी. याबद्दल लोकल 18 शी बोलताना तज्ञ हरिओम यांनी माहिती दिलीय.
advertisement
3/9
स्प्लिट एसी घ्यावा की विंडो एसी, याबद्दल बऱ्याचदा संभ्रमात असतात. कोणता एसी सर्वोत्तम आहे, कोणता एसी ऊर्जा वाचवतो आणि कोणत्या एसीमध्ये गॅस गळतीचा धोका असतो. या सर्व प्रश्नांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, स्प्लिट एसी आणि विंडो एसी यांपैकी कशाची कूलिंग क्षमता अधिक चांगली आहे.
advertisement
4/9
या सर्वांबद्दल अंकुर इलेक्ट्रिकल्सचे मालक हरिओम यांनी सविस्तरपणे माहिती दिलीय. त्यांच्यामते, विंडो एसी घ्यायचा म्हणजे खिडकी असलीच पाहिजे. विंडो एसी स्वस्त असतात आणि जिथे खिडकी असेल तिथे कुठेही बसवता येतात. विंडो एसी लहान आणि मोठ्या दोन्ही खोल्यांमध्ये बसवता येतात.
advertisement
5/9
स्प्लिट एसी अधिक महाग असतात, त्यांची किंमत 30,000 रुपयांपासून सुरू होते, तर विंडो एसीची किंमत 28,000 रुपयांपासून सुरू होते. या दोन्हीही एसीची कूलिंग क्षमता उत्कृष्ट असते. पण स्प्लिट एसी खोली लवकर थंड करतात, तर विंडो एसीला थोडा जास्त वेळ लागतो.
advertisement
6/9
हे दोन्ही एसी समान प्रमाणात वीज वापरतात. जर एअर कंडिशनर 1.5 टन क्षमतेचा असेल, तर तो तितकीच वीज वापरेल. 5-स्टार एअर कंडिशनर कमी वीज वापरतो, मग तो स्प्लिट एसी असो किंवा विंडो एसी. याबाबतीत दोन्ही एसी सारखेच असतात.
advertisement
7/9
बऱ्याच लोकांना गळतीची चिंता असते. त्याबद्दल तज्ञ हरिओम यांनी सांगितलं की, लोक स्प्लिट एसी खूप जास्त उंचीवर बसवतात आणि यामुळे गॅस गळतीचा धोका वाढतो. एसी कमी उंचीवर बसवल्यास गॅस गळतीचा धोका कमी होतो.
advertisement
8/9
स्प्लिट एसीमध्ये गॅस गळतीचा धोका थोडा जास्त असतो. कारण त्याची पाईपलाईन लांब असते. प्रत्येक युनिटच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे कनेक्शन केलेलं असतं. विंडो एसीमध्ये कधीही गॅस गळती होत नाही. कारण खिडकी खूप जास्त उंचीवर नसते आणि एसीची कमी उंचीवर बसवलेला असतो.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Window Vs Split AC : स्प्लिट एसी चांगला की विंडो एसी? तुम्हालाही पडलाय प्रश्न? तज्ज्ञांनी दिलं बेस्ट सोल्युशन