TRENDING:

AC सुरू असताना छताचा पंखा चालवावा की नाही? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतं वीज बिल; जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत

Last Updated:
काही जणांना वाटतं की, पंखा सुरू ठेवल्याने गरम हवा खाली येईल आणि एसीचा थंडावा कमी होईल. तर काही जण मानतात की पंख्यामुळे एसीवरचा ताण कमी होतो. नक्की सत्य काय आहे?
advertisement
1/9
AC सुरू असताना छताचा पंखा चालवावा की नाही? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतं वीज बिल; जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत
उन्हाळ्याचा तडाखा वाढला की घराघरांत एअर कंडिशनर म्हणजेच AC धडाक्यात सुरू होतात. बाहेर कितीही उष्णता असली तरी एसीमुळे घरात मनासारखा गारवा मिळतो. पण एसी सुरू केल्यानंतर अनेकदा आपल्या घरात एक मोठी चर्चा रंगते ती म्हणजे एसी सुरू असताना पंखा (Ceiling Fan) सुरू ठेवावा की बंद करावा?
advertisement
2/9
काही जणांना वाटतं की, पंखा सुरू ठेवल्याने गरम हवा खाली येईल आणि एसीचा थंडावा कमी होईल. तर काही जण मानतात की पंख्यामुळे एसीवरचा ताण कमी होतो. नक्की सत्य काय आहे? विज्ञानाच्या दृष्टीने आणि तुमच्या खिशाच्या दृष्टीने कोणती पद्धत फायदेशीर आहे? चला, यामागचं नेमकं गणित समजून घेऊया.
advertisement
3/9
एसी आणि पंखा: एक परफेक्ट जोडी खरं तर, एसी सुरू असताना पंखा चालवणं हे अत्यंत फायदेशीर असतं. यामागची काही महत्त्वाची कारणं खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
4/9
एसीमधून निघणारी ठंडी हवा जड असते, त्यामुळे ती जमिनीलगत साचून राहते. छताचा पंखा ही थंड हवा संपूर्ण खोलीत पसरवण्याचं काम करतो. यामुळे खोलीचा कोपरा अन् कोपरा लवकर थंड होतो. जेव्हा पंखा फिरतो, तेव्हा तो आपल्या शरीरावरील घाम लवकर सुकवतो, ज्यामुळे आपल्याला एसीच्या ठराविक तापमानापेक्षाही जास्त थंडावा जाणवतो.
advertisement
5/9
खोली लवकर थंड झाल्यामुळे एसीच्या कॉम्प्रेशरला जास्त वेळ काम करावं लागत नाही, ज्यामुळे यंत्राचं आयुष्य वाढतं.
advertisement
6/9
वीज बिल कसं वाचवायचं? जर तुम्ही योग्य पद्धतीने एसी आणि पंख्याचा वापर केला, तर तुमच्या वीज बिलात 30% ते 50% पर्यंत बचत होऊ शकते. त्यासाठी या टिप्स फॉलो करा
advertisement
7/9
1. तापमान 24-26 वर सेट करा: एसी 18 किंवा 20 अंशावर चालवण्याऐवजी तो 24 ते 26 अंशावर ठेवा. हा मानवी शरीरासाठी सर्वात आरामदायक कम्फर्ट झोन आहे. 2. पंखेचा वेग कमी ठेवा: पंखा फुल स्पीडवर न ठेवता किमान (Minimum) वेगावर ठेवा. यामुळे थंड हवा विस्कळीत न होता व्यवस्थित पसरते. 3. खिडक्या-दारे बंद ठेवा: हे सांगण्याची गरज नाही की, एसीचा गारवा बाहेर जाऊ नये म्हणून सर्व दारे आणि खिडक्या नीट बंद असल्याची खात्री करा.
advertisement
8/9
नक्की किती बचत होईल?एका अंदाजानुसार, जर तुम्ही फक्त एसी 6 तास चालवला, तर साधारण 12 युनिट वीज खर्च होऊ शकते. पण जर तुम्ही एसी 24 अंशावर ठेवून सोबत पंखा चालवला, तर तोच थंडावा मिळवण्यासाठी केवळ 6 ते 7 युनिट वीज खर्च होईल. म्हणजेच अर्ध्यावर बचत.
advertisement
9/9
थोडक्यात काय तर एसी आणि पंखा हे एकमेकांचे शत्रू नसून मित्र आहेत. त्यांचा एकत्रित वापर केल्याने तुम्हाला फक्त थंडावाच मिळत नाही, तर महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीज बिलापासूनही सुटका मिळते. त्यामुळे आजपासूनच ही पद्धत अवलंबून पहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
AC सुरू असताना छताचा पंखा चालवावा की नाही? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतं वीज बिल; जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल