TRENDING:

कारमध्ये लागणाऱ्या Warning Lights काय सांगतात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान

Last Updated:

तुमच्या कारच्या डॅशबोर्डवरील या ट्रॅफिक लाइट्सचा नेमका अर्थ काय, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नव्या कोऱ्या कारच्या ड्रायव्हर सीटवर बसल्यावर समोर दिसणारा चकाचक डॅशबोर्ड कोणाला आवडत नाही? पण गाडी सुरू केल्यावर किंवा चालवताना अचानक तिथे एखादी रंगीत लाइट लुकलुकू लागली, तर अनेकदा नवीन ड्रायव्हर्सचा गोंधळ उडतो. काही जण या छोट्या चिन्हांकडे दुर्लक्ष करतात, तर काही जण घाबरून जातात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

खरं तर, तुमची आधुनिक कार बोलू शकत नसली तरी, ती या लाइट्सच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत असते. एखादी लाइट लागणे म्हणजे तुमच्या कारने दिलेला तो एक इशारा असतो. जर तुम्ही वेळीच ही भाषा समजून घेतली, तर रस्त्यावर होणारा संभाव्य अपघात आणि इंजिन दुरुस्तीचा लाखो रुपयांचा खर्च तुम्ही सहज वाचवू शकता. चला तर मग, तुमच्या कारच्या डॅशबोर्डवरील या ट्रॅफिक लाइट्सचा नेमका अर्थ काय, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.

advertisement

डॅशबोर्डवरील सिग्नल तीन रंगांचा खेळ

कारच्या डॅशबोर्डवरील लाइट्सना तुम्ही रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नलप्रमाणे समजू शकता. त्यांचे तीन मुख्य रंग तीन वेगवेगळ्या परिस्थिती दर्शवतात.

लाल लाइट (गंभीर चेतावणी): जर लाल रंगाची लाइट लागली, तर याचा अर्थ परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळी गाडी तात्काळ सुरक्षित ठिकाणी थांबवून इंजिन बंद करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कारचे कायमचे नुकसान होऊ शकते.

advertisement

पिवळी/अंबर लाइट (सावधानता) : ही लाइट सूचित करते की कारमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. तुम्ही गाडी चालवू शकता, पण लवकरच सर्व्हिस सेंटरला जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.

हिरवी/निळी लाइट (माहिती) : ही लाइट भीतीसाठी नाही, तर माहितीसाठी असते. उदा. हेडलाइट सुरू असणे, इंडिकेटर किंवा क्रूझ कंट्रोल सुरू असणे हे यातून समजते.

advertisement

काही चिन्हे अशी आहेत, जी दिसताच तुम्ही सावध व्हायला हवे

1. चेक इंजिन लाइट : इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचा हा संकेत आहे. ही लाइट सतत लागत असेल किंवा ब्लिंक करत असेल, तर त्वरित मॅकेनिकला दाखवा.

2. ऑईल प्रेशर लाइट (लाल तेलाचा दिवा) : याचा अर्थ इंजिनमध्ये तेलाची कमतरता आहे किंवा प्रेशर कमी झाले आहे. ऑईलशिवाय गाडी चालवल्यास इंजिन सीझ होऊ शकते.

advertisement

3. बॅटरी लाइट : बॅटरी चार्ज होत नाहीये किंवा अल्टरनेटरमध्ये बिघाड आहे, असे हे चिन्ह सुचवते.

4. ब्रेक सिस्टिम लाइट : ब्रेक फ्लुइड कमी असणे किंवा ब्रेकशी संबंधित गंभीर समस्या असल्यास ही लाइट लागते. सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे.

इतर काही सामान्य चिन्हे

TPMS लाइट : टायरमधील हवेचा दाब कमी असल्याचे हे चिन्ह आहे.

कूलंट टेम्परेचर लाइट : तुमचे इंजिन प्रमाणाबाहेर गरम होत असल्याचे हे लक्षण आहे.

एअरबॅग लाइट : एअरबॅग सिस्टिममध्ये बिघाड असू शकतो, जो अपघाताच्या वेळी धोकादायक ठरू शकतो.

लाइट लागल्यावर काय करावे?

सर्वात आधी घाबरू नका. लाइटचा रंग पहा. जर तो लाल असेल, तर रिस्क घेऊ नका; गाडी बाजूला उभी करा. जर रंग पिवळा असेल, तर सावधगिरीने गाडी जवळच्या सर्व्हिस सेंटरपर्यंत नेऊ शकता. कारच्या मॅन्युअलमध्ये या सर्व चिन्हांची सविस्तर माहिती दिलेली असते, ती एकदा वाचून घेणे कधीही उत्तम.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रँडला ठार मारण्याआधी चाफेकर बंधूंनी इथं घेतली होती शपथ, ब्रिटिशांनी हीच 'ती' मूर्ती केली जप्त, Video
सर्व पहा

डॅशबोर्डवरील या लाइट्स तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून सुरक्षित ठेवण्यासाठी असतात. गाडीची भाषा समजून घेतली, तर तुमचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल.

मराठी बातम्या/ऑटो/
कारमध्ये लागणाऱ्या Warning Lights काय सांगतात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल