पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आळंदी परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं, त्यामुळे हत्येचं गुढ वाढलं आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात ही घटना घडली आहे. धनश्री केदारी (वय ६ वर्ष) आणि मंगल शिंदे (वय ७५) अशी मृतांची नावं आहेत. धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. बुधवारी रात्री त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपायला सोडलं होतं. मात्र, आज सकाळी त्या परत आल्यावर दोघींचीही हत्या झाल्याचे उघड झालं.
रात्रीच्या वेळी घरात घुसून अज्ञात व्यक्तीने धनश्री आणि मंगल शिंदे यांची हत्या केली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली का, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण, या अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संगिता शिंदे यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरलं आहे.
घरातून चोरीला काहीच गेलं नाही!
सकाळी ९ वाजेच्या सुमारास माहिती मिळाली होती. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केळगाव इथं ठाकरवाडी या वस्तीमध्ये ही खुनाची घटना घडली. फिर्यादी संगिता शिंदे यांनी तक्रार दिली आहे. संगिता शिंदे या हाऊसकिपिंगचं काम करतात. गुरुवारी रात्री त्या कामाला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी ६ वर्षांची धनश्री शिंदे हिला समोरील घरात मंगल शिंदे यांच्या घरी पाठवलं होतं. रात्री घरात अज्ञात व्यक्तीने शिरून दोघींच्य डोक्यात शस्त्राने वार केला होता. घरामध्ये कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही, दरवाजा हा तुटलेला नाही, दरवाजा हा उघडलेला होता. किंवा चुकून दरवाजा उघडला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा खून कुणी केला, याचा शोध घेतला जात आहे.
