advertisement

पुण्यात आज इतका पाऊस का पडला? नेमकं काय कारण? हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं, Video

Last Updated:

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पुणे शहर आणि परिसराला चांगलाच झोडपून काढलं आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

+
News18

News18

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पुणे शहर आणि परिसराला चांगलाच झोडपून काढलं आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबले, रस्ते जलमय झाले आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पुण्यात एवढा पाऊस का पडला याबद्दलच हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी माहिती दिली.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी तर वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढणेही कठीण झाले. अनेक वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः खालच्या भागांमध्ये पाणी साचल्याने घरांमध्येही पाणी शिरल्याचे प्रकार घडले. याशिवाय, वादळी वाऱ्यामुळे शहरातील विविध भागांत झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्यासह नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
advertisement
या अवकाळी पावसामागील कारणे स्पष्ट करताना हवामान तज्ज्ञांनी दोन प्रमुख हवामान प्रणाली जबाबदार असल्याचे सांगितले आहे. दक्षिणेकडून म्हणजे तमिळनाडूपासून महाराष्ट्रापर्यंत द्रोणी रेषा सक्रिय झाली आहे. यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात आर्द्रता (ओलावा) हवेत प्रवेश करत आहे.
हवेच्या वरच्या थरांमध्ये वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण आणि त्यासोबतच जेट प्रवाह दक्षिणेकडे सरकल्यामुळे वादळी पावसाची स्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत कमी वेळेत जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वाढते. सध्या पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत याच प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे.
advertisement
मान्सूनमधील पाऊस हा सामान्यतः संततधार स्वरूपाचा असतो, मात्र सध्या सुरू असलेला पाऊस हा वादळी स्वरूपाचा असल्याने अल्पावधीत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. काही ठिकाणी 30 ते 40 मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे, जी या काळात लक्षणीय मानली जाते.
हवामान विभागाने यापूर्वी पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र परिस्थितीत काहीसा बदल झाल्याने आता उद्यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि इतर काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः वादळी वाऱ्याच्या काळात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत, अवकाळी पावसाने पुणेकरांना दिलासा आणि त्रास अशा दोन्ही गोष्टी दिल्या असून पुढील काही दिवसही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात आज इतका पाऊस का पडला? नेमकं काय कारण? हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं, Video
Next Article
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement