advertisement

सायरस पूनावाला यांनी मुंबईत खर्च केले 167.20 कोटी, असं काय खरेदी केलं? ज्याची आता जगभर चर्चा होतेय, तुम्हीही थक्क व्हाल!

Last Updated:

Cyrus Poonawalla: सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी मुंबईत एका गोष्टीची खरेदी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी तब्बल 167.20 कोटी रुपये मोजले आहेत.

News18
News18
मुंबई: सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आणि चेअरमन सायरस पूनावाला हे एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. पूनावाला हे भारतातील अग्रगण्य उद्योगपती असून त्यांनी 1966 साली पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि आज ते जगातील सर्वात मोठ्या लसी उत्पादक संस्थांपैकी एक बनले आहे.
पूनावाला यांचे कार कलेक्शन अत्यंत समृद्ध आणि आलिशान मानला जातो. उपलब्ध माहितीनुसार त्यांना विशेषतः रोल्स-रॉयस सिल्वर स्पर लिमोझिनसारख्या लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक विंटेज तसेच आधुनिक गाड्यांचा समावेश आहे. मात्र आज त्यांच्या कला प्रेमाचाही एक अनोखा पैलू समोर आला आहे.
लसीकरण क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या पूनावाला यांनी आता कला क्षेत्रातही मोठी छाप पाडत राजा रवि वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या ऐतिहासिक चित्रासाठी तब्बल 167.20 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून ते खरेदी केले आहे. ही खरेदी भारतीय कला विश्वात नवा इतिहास रचणारी ठरली आहे.
advertisement
आज त्यांनी भारतीय चित्रकलेचे जनक मानले जाणारे राजा रवि वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या प्रसिद्ध पेंटिंगची खरेदी केली. ही खरेदी मुंबईत झालेल्या Saffronart च्या ‘स्प्रिंग लाईव्ह ऑक्शन’मध्ये करण्यात आली असून त्यासाठी त्यांनी तब्बल 167.20 कोटी रुपये (सुमारे $17.9 मिलियन) मोजले.
या व्यवहारासह ही पेंटिंग लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडी आधुनिक भारतीय कलाकृती ठरली आहे. या ऐतिहासिक खरेदीमुळे भारतीय आर्ट मार्केटमध्ये एक नवा बेंचमार्क तयार झाला असून याआधी M. F. Husain यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या कलाकृतींचे विक्रमही मागे पडले आहेत.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by SAFFRONART (@saffronartindia)



advertisement
या लिलावात सर्वाधिक बोली सायरस पूनावाला यांनीच लावली. लिलावापूर्वी या पेंटिंगची किंमत अंदाजे 80 ते 120 कोटी रुपयांच्या दरम्यान असावी, असे मानले जात होते. मात्र पूनावालांच्या उच्च बोलीमुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला.
पेंटिंग खरेदी केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राजा रवि वर्मा यांच्या या सुप्रसिद्ध कलाकृतीचे जतन करणे हे त्यांच्यासाठी अत्यंत भाग्याची बाब आहे. त्यांनी हेही आश्वासन दिले की ही ‘राष्ट्रीय ठेवा’ मानली जाणारी कलाकृती वेळोवेळी सर्वसामान्य लोकांसाठीही पाहण्यास उपलब्ध करून दिली जाईल.
advertisement
ही पेंटिंग 1890 च्या दशकात तयार करण्यात आली होती. जे राजा रवि वर्मा यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च काळ मानला जातो. या चित्रामध्ये वात्सल्य आणि ममतेचे अत्यंत सुंदर आणि जिवंत चित्रण केले गेले आहे. यात आई यशोदा गायीचे दूध काढताना दिसते, तर लहानसा कृष्ण मागून दूधाच्या भांड्याकडे हात पुढे करताना दाखवला आहे.
advertisement
रवि वर्मा यांची खासियत म्हणजे त्यांनी पौराणिक प्रसंगांना इतक्या जिवंतपणे रंगवले की त्यातून एकाच वेळी घरगुती आणि पवित्र असे दोन्ही भाव व्यक्त होतात. या ऑइल पेंटिंगमध्ये रंगसंगतीचे अप्रतिम संतुलन आणि मानवी भावनांची खोली दिसून येते, ज्यामुळे ही कलाकृती जगातील अत्यंत खास आणि मौल्यवान कलाकृतींपैकी एक ठरते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
सायरस पूनावाला यांनी मुंबईत खर्च केले 167.20 कोटी, असं काय खरेदी केलं? ज्याची आता जगभर चर्चा होतेय, तुम्हीही थक्क व्हाल!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement