advertisement

Pune News: पुण्याच्या धो-धो पावसात 'तो' थांबली नाही पण खड्यात पाय अडकला अन्...डिलिव्हरी बॅायला पाहून पुणेकर हळहळला!

Last Updated:

भर पावसात डिलिव्हरी बॉय पाण्यात पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. डिलेव्हरी बॉयचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून भावनिक कमेंट्स करण्यात येत आहेत.

News18
News18
प्रतिनिधी- अभिजित पोते, पुणे
पुणे: गेल्या चार दिवसांपासून सलग पुणे आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून रस्त्यावरून पाणी दुथडी भरून वाहत आहे. या पावसामध्ये अनेकदा वाहन चालकांची तारांबळ उडते. असाच एक काहीसा प्रकार पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामध्ये एका डिलेव्हरी बॉयसोबत घडला आहे. रस्त्यावर दुथडी भरून पाणी वाहत असल्यामुळे त्याची बाईक रस्त्यावचरच बंद पडली. बंद पडलेली बाईक पुन्हा चालू करत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
भर पावसातही कर्तव्य बजावत असताना एक डिलिव्हरी बॉय पाण्यात पडला. त्याच्या दुचाकीला असलेला बॉक्स सुद्धा यावेळी उघडला गेला. तो पाण्यात पडल्याचे पाहून तीन जणांनी त्याला उचलून सावरून घेतलं. पाण्यातून वाट काढताना या डिलिव्हरी बॉयला मात्र मोठी कसरत करावी लागली. ही सगळी घटना व्हिडिओ मध्ये कैद झाली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून भावनिक कमेंट्स करण्यात येत आहेत. ग्राहकांना कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने त्यांचं पार्सल पोहोचवलं जाईल, या प्रयत्नात कोणताही डिलेव्हरी बॉय कायमच असतो. भर पावसातही कर्तव्य बजावणाऱ्या फुड डिलेव्हरी बॉयचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
advertisement
ऊन, थंडी किंवा पाऊस असो, कोणत्याही ऋतुमध्ये आपलं कर्तव्य बजावण्याचं काम फुड डिलेव्हरी बॉय करतात. ग्राहकांना कमीत कमी वेळेमध्ये, कशापद्धतीने त्याची ऑर्डर पोहोचवली जाईल, याकडे त्यांचा विशेष भर असतो. जीवाची कोणतीही पर्वा न करता डिलेव्हरी बॉय ग्राहकांना सेवा पुरवण्याचे काम करतात. ऑर्डर बुक केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आपल्या घरी बुक केलेली ऑर्डर अगदी सहज पद्धतीने येते. कायमच ग्राहकांकडून डिलेव्हरी बॉयचा सन्मान आणि आदर केला जातो. कारण की, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही गोष्टीची परवा न करता तो आपल्याला सेवा पुरवतो. त्यामुळे सहाजिकच आपल्याला त्याचा आदर राखायलाच हवा.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्याच्या धो-धो पावसात 'तो' थांबली नाही पण खड्यात पाय अडकला अन्...डिलिव्हरी बॅायला पाहून पुणेकर हळहळला!
Next Article
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement