IPL 2026 : नेटमधली बॉलिंग पाहून थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये आणलं, इशानने KKR विरुद्ध खेळला जुगार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये सर्व 10 टीमच्या प्रत्येकी एक-एक मॅच झाल्या आहेत. यानंतर आता केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद त्यांचा दुसरा सामना खेळत आहेत.
advertisement
1/8

केकेआर आणि हैदराबाद यांचा त्यांच्या यंदाच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पराभव झाला. केकेआरला मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागला तर सनरायजर्स हैदराबादचा आरसीबीने धूळ चारली.
advertisement
2/8
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये सनरायजर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर तर केकेआर सातव्या क्रमांकावर आहे. आता या सामन्यात विजय मिळवून खात्यात पहिले 2 पॉईंट्स टाकण्यासाठी दोन्ही टीम आग्रही असतील.
advertisement
3/8
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. केकेआरची खेळपट्टी मोठ्या स्कोअरसाठी ओळखली जाते, त्यामुळे या सामन्यातही रनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/8
केकेआर आणि हैदराबाद यांना या मोसमात बॉलर्सच्या दुखापतीने अडचणींचा सामना करावा लागत आहे. केकेआरचा हर्षित राणा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला, तर मथिशा पथिराणाही दुखापतीतून बरा होत असल्यामुळे अजून खेळण्यासाठी उपलब्ध नाही. तर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार आणि फास्ट बॉलर पॅट कमिन्सही दुखापतीमुळे खेळू शकत नाहीये.
advertisement
5/8
या सामन्यामध्ये केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. इथल्या खेळपट्टीवर फार गवत नसतं, तसंच पाऊसही आहे, त्यामुळे आम्ही पहिले बॉलिंग करणार आहोत, असं अजिंक्य रहाणे म्हणाला आहे.
advertisement
6/8
'आम्हीही आधी बॉलिंग केली असती, पण आता आधी बॅटिंग करायची असल्यामुळे आम्हाला बॉल पाहून खेळावं लागेल. आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल, मैदानात जाऊन मुलभूत गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. परिस्थिती चांगली नसली तरी शांत राहणं गरजेचं आहे. आम्ही टीममध्ये एक बदल केला आहे, शिवांग कुमार टीममध्ये आला आहे, नेटमध्ये तो चांगली बॉलिंग करत आहे', असं हैदराबादचा कर्णधार इशान किशन म्हणाला आहे.
advertisement
7/8
केकेआरची प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे, कॅमरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, सुनिल नारायण, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, ब्लेसिंग मुझरबानी
advertisement
8/8
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलिल अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, जयदेव उनाडकट, डेव्हिड पेन
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : नेटमधली बॉलिंग पाहून थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये आणलं, इशानने KKR विरुद्ध खेळला जुगार!