TRENDING:

Honey Singh: महिलांबद्दल नको नको ते गायला, हनी सिंगला कोर्टाने वठणीवर आणलं; 20 वर्ष जुन्या गाण्यामुळे प्रकरण शेकलं

Last Updated:
हनी सिंग आणि बादशहा या जोडीला आता दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २० वर्षांपूर्वी गाजलेल्या या जोडीच्या गाण्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
1/7
महिलांबद्दल नको नको ते गायला, हनी सिंगला कोर्टाने वठणीवर आणलं
सध्या बॉलिवूड आणि कोर्टाचा वाद वाढताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या आक्षेपार्ह गाण्यावर कोर्टाने ताशेरे ओढत, ते गाणं सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले होते.
advertisement
2/7
अशातच बादशाह पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, यावेळी त्याच्यासोबत प्रसिद्ध पंजाबी आणि बॉलिवूड गायक-रॅपर हनी सिंगचाही समावेश आहे.
advertisement
3/7
हनी सिंग आणि बादशहा या जोडीला आता दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २० वर्षांपूर्वी गाजलेल्या या जोडीच्या गाण्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली असून हे गाणं आता कायमचं कालबाह्य होणार आहे.
advertisement
4/7
दिल्ली हायकोर्टाने जवळपास २००५-२००६ साली रिलीज झालेलं 'माफिया मुंडीर' (व्हॉल्यूम १) हे गाणं यूट्यूब, स्पॉटिफाई आणि इतर सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच नाही, तर हे आदेश देताना वापरलेले शब्द इतके कडक आहेत की, त्याने संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे.
advertisement
5/7
या प्रकरणाची सुनावणी करताना हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी गाण्यातील शब्दांवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती म्हणाले, "या गाण्यातील शब्द अत्यंत अश्लील, अभद्र आणि महिलांच्या सन्मानाला तडा पोहोचवणारे आहेत. हे गाणं ऐकल्यानंतर न्यायालयाची सद्सद्विवेकबुद्धी हादरली आहे. कोणताही सुसंस्कृत समाज इंटरनेटवर अशा प्रकारचा घाणेरडा मजकूर सहन करू शकत नाही."
advertisement
6/7
केवळ गाणं हटवण्याचे आदेश देऊन न्यायालय थांबलं नाही, तर हनी सिंग आणि बादशहा या दोघांनाही न्यायालयाने चांगलंच झापलं आहे. महिलांप्रति इतका अपमानकारक मजकूर प्रसारित करणे हे गंभीर असल्याचं न्यायालयाने नमूद केलं.
advertisement
7/7
या वादावर पडदा टाकण्यासाठी हनी सिंग आणि बादशहा या दोघांनीही सुरुवातीला हे गाणं आपण गायलंच नसल्याचा दावा केला होता. मात्र, एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये या गाण्याचे बोल सादर केल्याचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांची चांगलीच कोंडी झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Honey Singh: महिलांबद्दल नको नको ते गायला, हनी सिंगला कोर्टाने वठणीवर आणलं; 20 वर्ष जुन्या गाण्यामुळे प्रकरण शेकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल