वाईल्ड कार्ड म्हणून हिणवलं, तिनेच मारली बाजी! 'काटा गँग'ला जिंकवून दिली 'बिग बॉस मराठी 6' ची शेवटची कॅप्टन्सी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Last Captain: आज या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क पार पडला असून या घराला शेवटचा कॅप्टन मिळाला असून कॅप्टन बनून या स्पर्धकाने फिनालेमध्ये धडक मारली आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी ६ चं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतसा या शोमधील थरार वाढत चालला आहे. आज या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क पार पडला असून या घराला शेवटचा कॅप्टन मिळाला असून कॅप्टन बनून या स्पर्धकाने फिनालेमध्ये धडक मारली आहे.
advertisement
2/7
शेवटचं कॅप्टन्सी पद मिळवण्यासाठी जोरदार धडपड पाहायला मिळाली. एका बाजूला 'टोळी' गँगचे अनुश्री आणि सागर होते, तर दुसऱ्या बाजूला 'काटा' ग्रुपच्या तन्वी, दिपाली आणि रेवा यांनी कंबर कसली होती.
advertisement
3/7
या आठवड्यात रंगलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये उमेदवाराला प्रत्येकी एक समर्थक निवडायचा होता. यामध्ये दोन उमेदवारांना टनलमधून जाऊन दुसऱ्या बाजूला असलेल्या बॉक्समधून गोल्डन कॉईन काढायचा होता. या बॉक्सला तीन टाळी होती. १० चाव्यांमधून योग्य चावीने टाळी उघडून जो सर्वांत आधी कॉईन बाहेर काढेल, तो कॅप्टन असेल.
advertisement
4/7
अखेर या शर्यतीत 'काटा' ग्रुपने बाजी मारली असून एका अशा स्पर्धकाने बाजी मारली आहे, जिला सुरुवातीपासून 'वाईल्ड कार्ड' म्हणून हिणवलं गेलं होतं.
advertisement
5/7
तिन्ही राऊंड जिंकून रेवाने कॅप्टन्सी जिंकली असून ती पुढील आठवड्यासाठी सुरक्षित झाली आहे. रेवाने तीन राऊंडमध्ये अनुक्रमे तन्वी, अनुश्री आणि सागरला हरवून कॅप्टन्सीवर आपलं नाव कोरलं आहे.
advertisement
6/7
रेवा वाईल्ड कार्ड स्पर्धक असल्याने अनेकदा तिला जुन्या सदस्यांनी हलक्यात घेतलं होतं. तिच्यासोबत आलेले संकेत आणि संस्कृती आधीच घराबाहेर झाले. मात्र, रेवाने इतर स्पर्धकांमध्ये आपला खेळ दाखवून फिनालेमध्ये एन्ट्री केली आहे.
advertisement
7/7
रेवा कौरासे जेव्हा घरात वाईल्ड कार्ड म्हणून आली होती, तेव्हा तिला अनेकदा डावललं गेलं. "तू बाहेरून खेळ बघून आली आहेस," अशा टोमण्यांचा तिला सामना करावा लागला. पण रेवाने आपल्या संयमी खेळाने आणि जिद्दीने सर्वांची तोंडं बंद केली आहेत. या आठ जणांपैकी या सीझनची झळाळती ट्रॉफी कोणाच्या हातात पडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वाईल्ड कार्ड म्हणून हिणवलं, तिनेच मारली बाजी! 'काटा गँग'ला जिंकवून दिली 'बिग बॉस मराठी 6' ची शेवटची कॅप्टन्सी