TRENDING:

IAS Transferred: राज्यातील १३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय जारी, CM देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

Last Updated:

Maharashtra IAS Transferred: आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्च रोजी राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आज पुन्हा ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यातील १० ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयानंतर गुरूवारी रात्री उशीरा पुन्हा १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय जारी करण्यात आले आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
advertisement

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात दोनदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले.

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?

-सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली

advertisement

-कोल्हापूर जिल्हा परिषदेचे एस कार्तिकेयन यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली

-कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ राजेंद्र भारुड यांची बदली

-डॉ जसमीन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली

-डॉ विजय राठोड यांची कोल्हापूरच्या नूतन जिल्हाधिकारी म्हणून बदली

-चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली

-चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून नागपूर मनपातील अतिरिक्त आयुक्त वस्तुमना पंत यांची बदली

advertisement

-गोंदिया जिल्हाधिकारी पदावर डॉ. मंगेश गोंदवले यांची नियुक्ती

-भारत बास्टेवाड यांची लातूर जिल्हाधिकारीपदी बदली

-अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती

-मिन्नू पी.एम. यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर पदावर नियुक्ती

-वर्षा लढ्ढा यांची अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी बदली

-संजीता मोहपात्रा यांची सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तपदी बदली

दोन दिवसांपूर्वी कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?

advertisement

विनीत वैद्य सिंगल (भाप्रसे)- यांची प्रधान सचिव , मृद आणि जलसंधरण विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.

तुकाराम मुंढे (भाप्रसे)- यांची प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन , महसूल वन विभाग येथे बदली झाली आहे.

लोकेश चंद्रा (भाप्रसे)- यांची मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.

advertisement

लहू माळी (भाप्रसे)- यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित येथे बदली झाली आहे.

परिमल सिंह (भाप्रसे)- यांची सचिव (कृषी), कृषी आणि पदुम विभाग, मंत्रालय येथे बदली झाली आहे.

विकास चंद्र रस्तोगी (भाप्रसे) यांची- अप्पर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.

माणिक गुरसाळ (भाप्रसे) यांची - सचिव, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे बदली झाली आहे.

पृथ्वीराज बी. पी (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त वसई विरार महानगरपालिका येथे बदली झाली आहे.

आश्विनी भिडे (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे बदली झाली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, केळी अन् कांद्याचे भाव भूईसपाट, लिंबूला काय मिळाला दर?
सर्व पहा

प्रेरणा देशभ्रतार (भाप्रसे) यांची- आयुक्त, मत्य्यव्यवसाय मुंबई येथे बदली झाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: राज्यातील १३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय जारी, CM देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल