Marathi Serial : लालबाग-परळच्या कुटुंबाची स्टोरी TV वर हिट! पहिल्याच आठड्यात मालिकेचा TRP टॉप 10 मध्ये
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Serial TRP : पहिल्याच आठवड्यात मालिकेने TRP च्या टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. कोणती आहे ही मालिका?
advertisement
1/8

लालबाग-परळच्या कुटुंबावर आधारित नव्या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. वास्तववादी कथा, बोली आणि भावनिक नात्यांची गुंफण यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.
advertisement
2/8
विशेष म्हणजे पहिल्याच आठवड्यात मालिकेने TRP च्या टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. कलाकारांचा दमदार अभिनय आणि कथानकातील ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. झी मराठीची ही मालिका कोणती?
advertisement
3/8
लालबाग परळ मधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावतं आहे. म्हणून मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत मालिकेनं स्थान मिळवलं.
advertisement
4/8
कथानकातील वेगळेपणा आणि भावनिक गुंतवणूक आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
5/8
झी मराठीवरील ही मालिका आहे 'सनई चौघडे'. ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
advertisement
6/8
आता मालिकेच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होताच प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज असणार आहे.
advertisement
7/8
आपल्या प्रभावी अभिनयाने आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सने ओळखला जाणारा, बहुप्रतिभावान आणि संवेदनशील भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर 'सनई चौघडे'मध्ये दमदार कमबॅक करत आहे. तो मालिकेत सत्यजीत ही भूमिका साकारणार आहे.
advertisement
8/8
सध्या कथानकात शर्वरी नोकरीसाठी मुलाखती देताना दिसत आहे. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच आहे. त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो. या योगायोगमुळे कथानकाला नवा ट्विस्ट मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Serial : लालबाग-परळच्या कुटुंबाची स्टोरी TV वर हिट! पहिल्याच आठड्यात मालिकेचा TRP टॉप 10 मध्ये