TRENDING:

Mumbai Theft: मुंबईत चोरीची मोठी घटना, जैन मंदिरातून 1.75 कोटी रुपयांची मूर्ती चोरीला!

Last Updated:

Mumbai Theft News: लालबाग परिसरातील जैन मंदिरामध्ये चोरीची घटना घडली आहे. चोरीमध्ये चोरट्याने मंदिरातून 1.75 कोटींचा मुद्देमाल लंपास केलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईतील जैन मंदिरामध्ये करोडो रूपयांचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंदिरातून करोडो रूपयांचे दागिने चोरी झाल्याची घटना सोमवारी 30 मार्च रोजी उघडकीस आली. सध्या मंदिराच्या पदाधिकाऱ्यांकडून चोराचा शोध घेतला जात आहे. मंदिराच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेची काळाचौकी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांकडूनही घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना कळताच परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

लालबाग परिसरामध्ये असलेल्या जैन मंदिरामध्ये पावणे दोन कोटींचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. अविघ्न संकुलात मुनीसुरत स्वामी श्वेतांबर मुर्तिपूजक जैन संघ ट्रस्टचे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 30 मार्च रोजी पहाटे 5 वाजता मंदिर उघडण्यासाठी मंदिराचे पुजारी आले होते, त्यावेळी कडी आणि कोयंडा त्यांना उघडा असल्याचे आढळून आले. मंदिर उघडल्यानंतर मंदिरामध्ये काही चोरी झाले आहे का? याचा तपास केल्यानंतर मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार त्यांना कळाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, केळी अन् कांद्याचे भाव भूईसपाट, लिंबू काय मिळाला दर?
सर्व पहा

मंदिरामध्ये पाहिल्यानंतर त्यांना भगवान सिमंदर यांची संगमरवरी दगडाची मुर्ती गायब झाल्याचे निष्पन्न झाले. ही मुर्ती तब्बल पावणे दोन कोटींची होती. पावणे दोन कोटींची मुर्ती चोरी झाल्याची घटना कळताच त्यांनी लगेचच मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना कळवले. मंदिराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लगेचच काळाचौकी पोलीस स्थानकात धाव अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून आणि मंदिराच्या ट्रस्टकडून चोराचा शोध घेतला जात आहे. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोराचा शोध घेतला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Theft: मुंबईत चोरीची मोठी घटना, जैन मंदिरातून 1.75 कोटी रुपयांची मूर्ती चोरीला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल